शालीवाहन राजाची राजधानी कोरोनामुळे पडली ओस..

Paithan
Paithan

पैठण : कोरोनाच्या पादुर्भावाने राज्यातील संशयित रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. त्यामुळे राज्यभर भिंतीचे वातावरण पसरले आहे. या वातावरणाची मोठी झळ राज्य स्थरावर प्रसिद्ध असलेल्या पैठण या धार्मिक व पर्यटनस्थळाला बसली आहे.

कोरोनाच्या धास्तीने हे धार्मिक व पर्यटनस्थळ बंद करण्यात आली आहेत. अशिया खंडातील मातीचे सर्वात मोठे जायकवाडी धरण, संत ज्ञानेश्वर उद्यान, गोदावरीचे मोक्ष घाट, शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज यांची जन्मभुमी, जग प्रसिध्द पैठणी व शककर्ता शालिवाहन राजाची राजधानी.

असा वारसा लाभणाऱ्या धार्मिक व पर्यटनाच्या गजबजणाऱ्या शहरात व्यापारी, दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांवर कोरनोची कुऱ्हाड कोसळली आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सर्व स्थळे ओस पडली आहे. यामुळे पर्यटनाच्या व्यवसायावर अवलंबुन असणाऱ्यांना हा परिणाम जाणु लागला आहे. त्यामुळे संचारबंदी केव्हा उठणार व पुन्हा अजुन वाढणार असा चिंतेचा प्रश्न पुढे येवु लागला आहे.

परिक्षा संपल्यानंतर येथे पर्यटन व्यवसायाला गती येत असते. परंतु नेमके या व्यवसाय वाढीतच बंदी आल्यामुळे मोठी आर्थिक कोंडी आता निर्माण झाली आहे. संचारबंदी सुरु झाल्यामुळे शहर परिसर व बाजारपेठेतील उपहार गृहे, पान टपऱ्या, मिठाईची दुकाने, विविध इलेक्ट्रॉनिक दुकाने, कपड्याची दुकाने साड्या ड्रेस मटेरियलसह पैठणी साड्यांची दुकाने, दुचाकी चारचाकी शोरूम, लॉजिंग बोर्डिंग, लहान मोठ्या खाद्य प्रकाराची विक्री करणारे स्टॉल धारक, आठवडे बाजार व बाजारपेठ बंद झाल्या आहेत. त्यामुळे कोटय़वधीची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.

एसटी बसने येणाऱ्या भाविक, पर्यटकांची दररोजची मोठी संख्या आहे.परंतु एसटी सेवा बंद असल्यामुळे एसटी महामंडळाला ही मोठा आर्थिक फटका यामुळे सहन करावा लागत आहे. पर्यटक आणि भाविकांचा ओघ थांबल्यामुळे व्यवसायावर संकट गडद झाले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जायकवाडी धरण व संत ज्ञानेश्वर उद्यानाला अवकळा 

पैठणला येणारे पर्यटक या पर्यटन नगरीत प्रवेश करताच प्रथम जायकवाडी धरण बघण्यासाठी जातात. प्रवेशद्वाराच्या जमीनीपासुन उंचीवर असलेला हा नाथसागराचा अथांग सागर पाहुन पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटल्या शिवाय राहत नाही. त्यामुळे मोठी गर्दी येथे नेहमीच पाहायला मिळते.

हा सागरी आनंद पाहुन जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानात जावुन तेथील निसर्ग रम्य आनंद व संगीत कारंजे आणि बहरुन गेलेला हिरवागार परिसर पाहुन अधिकच आनंदी होवुन जातात. परंतु आता या दोन्ही पर्यटनस्थळी अवकळा पाहायला मिळत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
'पैठणी' चा अलंकार ही झाला लुप्त!

पैठणची ही पैठणी ही साडी मुळ पैठण च  असल्यामुळे पैठण हे शहर मुळ पैठणी साडीचे निर्मिती केंद्र आहे. राज्य नव्हे तर देश पातळीवरील पर्यटकांनी येथील पिढीजात पैठणी विणकरांच्या पैठणी केंद्राला भेटी देवुन गौरव केला आहे. शासनाचे ही भव्य पैठणीचे दालन व निर्मिती केंद्र आहे.

मऱ्हाटी पैठणी निर्मिती केंद्र असे या दालनाचे नाव आहे. त्यामुळे पैठणला येणाऱ्या महिला पर्यटकांचे हे खास आकर्षण ठरले आहे. त्यामुळे पैठणी विक्री उद्योग ही येथे मोठा आहे. परंतु संचारबंदीमुळे पैठणीचा मुक्त संचार बंद झाला आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com