कोरोनाकहर थांबेना, औरंगाबादेत एकाच दिवसात 14 बळी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

औरंगाबादेत कोरोनाचा कहर थांबता थांबेना. बुधवारी 12 बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर गुरूवारीही 14 जणांचा बळी गेला. दिवसेंदिवस संसर्ग वाढतच असून रुग्णसंख्येचा आणि बळींचाही विक्रम होत आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वांचीच चिंता वाढली आहे.

औरंगाबाद - औरंगाबादेत गुरूवारी कोरोनाबाधित आणखी चौदा रुग्णांचा मृत्यू झाला. यात दहा पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने २३२ बळी घेतले आहेत. यात घाटी रुग्णालयात १७३, खासगी रुग्णालयात ५८ व जिल्हा रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शहरातील मृत्यू
रहेमानिया कॉलनी : ४० वर्षीय महिला २३ जूनला घाटीत दाखल. २४ जूनला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह. २३ जूनला रात्री त्यांचा मृत्यू झाला. 
छावणी, पेन्शनपुरा :  ५५ वर्षीय पुरुष रुग्ण १६ जूनला घाटीत दाखल. १७ जूनला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. २४ जूनला दुपारी मृत्यू झाला. 
कटकटगेट :  ६६ वर्षीय पुरुष २० जूनला घाटीत दाखल. २१ जूनला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह. २४ जूनला दुपारी मृत्यू झाला. 
नूतन कॉलनी : ६० वर्षीय महिलेला २४ जूनला घाटीत दाखल केले होते. २४ जूनला सायंकाळी मृत्यू झाला. कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. 
सईदा कॉलनी : ७३ वर्षीय पुरुषाला २४ जूनला घाटीत दाखल केले होते. त्यांचा २४ जूनला रात्री मृत्यू झाला. हवाल आज पॉझिटिव्ह आला. 
भारतनगर एन-१३ : ७० वर्षीय महिलेला पाच जूनला घाटीत दाखल केले. सहा जूनला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. २४ जूनला रात्री मृत्यू. 
नॅशनल कॉलनी : ४९ वर्षीय पुरुषाला १७ जूनला घाटीत दाखल केले होते. १८ जूनला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. २४ जूनला मध्यरात्रीनंतर मृत्यू. 
मुजीब कॉलनी, रोशनगेट : ६५ वर्षीय पुरुषाला १४ जूनला घाटीत भरती केले होते. १५ जूनला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. आज पहाटे मृत्यू. 
देवळाई : ५२ वर्षीय पुरुषाला २१ जूनला घाटीत भरती केले होते. त्याच दिवशी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. आज सकाळी मृत्यू झाला. 
मदनी चौक : ७० वर्षीय पुरुषाला १३ जूनला घाटीत भरती केले. १४ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.फाजलपुरा : ५० वर्षीय महिलेला १२ जूनला घाटीत दाखल केले. सहा जूनला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ग्रामीणमधील मृत्यू  
आझमशाहीपुरा, खुलताबाद :
६० वर्षीय पुरुषाला २२ जूनला घाटीत भरती केले होते. २३ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. खुलताबाद : ६० वर्षीय पुरुषाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय ५३ वर्षीय पुरुषाला खासगी रुग्णालयात भरती केले होते. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार सुरू होते. त्यांचा आज मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 deaths in a single day due to corona in Aurangabad