CoronaVirus : औरंगाबाद@ १७७, एकाच दिवसात तब्बल नवे ४७ रुग्ण

Thursday, 30 April 2020

सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत १२४ जणांना कोरोनाची लागण झाली. ही आकडेवारी चिंतेत भर टाकणारी आहे. 

औरंगाबाद : शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. आज (ता. ३०) एकाच दिवसात तब्बल ४७ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे शहराचा आकडा १७७ वर पोचला, अशी माहिती शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत १२४ जणांना कोरोनाची लागण झाली. ही आकडेवारी चिंतेत भर टाकणारी आहे. 

शहरात कोरोनाकंप सुरूच असून, गुरुवारी सकाळी २१ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सायंकाळी २७ जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. सोमवारी एकाच दिवशी २९ जण, मंगळवारी २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बुधवारी २१ व गुरुवारी उच्चांक गाठीत तब्बल ५४ रुग्ण असे सर्व मिळून चार दिवसांत १२४ जणांना लागण झाल्याने औरंगाबादकरांना अधिक सजग राहून काळजी घ्यावी लागणार आहे. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
 

सकाळची परिस्थिती
गुरुवारी सकाळच्या सत्रात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यात जयभीमनगर येथील ०६, किलेअर्क येथील ०१, आसेफिया कॉलनीतील ०२, नूर कॉलनी, कैलासनगर, चिखलठाणा, बेगमपुरा (घाटी रुग्णालयाचा ब्रदर), सावरकरनगर येथील प्रत्येकी ०१ अशा १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

दुपारची परिस्थिती 
दुपारच्या सत्रात ०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात किलेअर्क ०४, नूर कॉलनी ०२, भीमनगर ०१ येथील रुग्णांचा समावेश आहे.
  
संजयनगर, मुकुंदवाडी हॉटस्पॉट
संजयनगर, मुकुंदवाडी भागात १८, नुर कॉलनी २, खडकेश्‍वर १, बीडबायपास १, रोहिदासनगर, मुकुंदवाडी २, नारेगाव अजिज कॉलनी २, रोशनगेट १, भीमनगर २, किलेअर्क ४ अशा एकूण ३३ रुग्णांचा समावेश आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 184 corona patients in Aurangabad