esakal | आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण न घालता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

'भेटून सांत्वन करायला येऊ नका. माझ्या आईच्या आत्मत्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा,’ अशी पोस्ट लिहिली. कोरोनाच्या लढ्यात जातीने लक्ष घालून असलेले पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मदतीसाठी त्यांनी लगेच ‘बॅक टु वर्क’ अशीही भूमिका घेत घरुन पूर्णवेळ कामही सुरू केले.

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण न घालता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी (बीड) : कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. त्यावर उपाय योजनांसाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. यात आपलाही खारीचा वाटा म्हणून आईच्या गोड जेवणाच्या, उत्तरक्रियेच्या कार्यक्रमाची रक्कम त्यांनी कोरोनाशी लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन एक नवा आदर्श निर्माण केला. 

परळी येथील इंदूबाई भास्करराव जोशी यांचे ता. दोन एप्रिलला निधन झाले. त्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत जोशी यांच्या आई होत्या. पुर्वी मुंडे यांचे प्रसिद्धीप्रमुख आणि आता मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून प्रशांत जोशी यांचा विविध घटकांत राबता आहे. त्यामुळे त्यांची आई गेल्याचे कळताच त्यांच्या सांत्वनासाठी काही ना काही पर्याय शोधून लोक येऊ लागले.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

प्रशांत जोशी यांनी फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांद्वारे ‘माझ्या आभाळाएवढ्या दु:खात आपण सर्व सहभागी आहातच. परंतु, माझ्या दु:खापेक्षा कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे भेटून सांत्वन करायला येऊ नका. माझ्या आईच्या आत्मत्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा,’ अशी पोस्ट लिहिली. कोरोनाच्या लढ्यात जातीने लक्ष घालून असलेले पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मदतीसाठी त्यांनी लगेच ‘बॅक टु वर्क’ अशीही भूमिका घेत घरुन पूर्णवेळ कामही सुरू केले. 

कावेरी जातीची अंडी मिळतील औरंगाबादच्या या केंद्रात  

दरम्यान, आता इंदूबाई जोशी यांचा गोड जेवणाचा, उत्तरक्रियेचा कार्यक्रमही लॉकडाऊनमुळे कौटुंबिक पद्धतीनेच नैवेद्य दाखवून उरकून घेतला. त्यानंतर याची २५ हजार रुपयांची रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. प्रशांत जोशी यांनी पाडलेला हा नवा पायंडा समाजापुढे एक आदर्श ठरल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

loading image
go to top