तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे... 

अनिल जमधडे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिना निमित्त हजारो अनुयायी विद्यापीठ गेटवर जमले होते. यावेळी गितांमधून बाबासाहेबांचे दर्शन घडवणाऱ्या अंध गायकांनी लक्ष वेधून घेतले. एकापेक्षा एक सरस भीमगित सादर करुन या कलाकारांनी आपल्या क्षमता दाखवून दिल्या. 

नामविस्तार दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमासाठी विद्यापीठ गेट पसिराला दिवसभरात हजारो नागरीकांनी भेट देऊन अभिवादन केले. या ठिकाणी राज्याच्या विविध भागातील गायकांनी हजेरी लावून आपल्या गीतांमधून बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे विचार सांगण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : विद्यापीठ गेटवर साहित्य जत्रा 
 
अंध गायकांचा बोलबाला 

विद्यापीठाच्या संपुर्ण परिसरात तीन ठिकाणी अंध गायकांनी प्रबोधन करताना लक्ष वेधून घेतले. कलासागर सारथी निगडी पुणे येथील अंध कलाकार अशोक वाडेकर, विनोद पवार, मिना वाल्हेकर, प्रविण उबाळे, विमल कचाटे, बाळु कचाटे, प्रितम उबाळे, अंबादास मंडलीक या अंध गीतकारांनी ताल सुरावर बाबासाहेबांचे एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण केले. 

गीतांनी मधून बाबासाहेब 

"तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे, 
"जीवानं जीवाच रान माझ्या भीमानं केलं, 
नऊ कोटीची माता ही उदार अंतकरणाची 
रमाई झाली स्फुर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची' 
"दिन दुबळ्याचा निळा झेंडा खरी शान आहे. घटना भीमाची देशाचा खरा प्राण आहे'. 
अशा एकापेक्षा एक सरस आंबेडकरी गीतांच्या सादरीकरणांनी अंध गायकांनी लक्ष वेधून घेतले. 

हेही वाचा : म्हणून विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनिक 

अंध दाम्पत्यांचे प्रबोधन 

वाडेगाव पांघुरणा (ता. मंठा) येथील धर्मानंद देवराव मोरे आणि गंगुबाई मोरे या अंध दाम्पत्यांनी भीम गितांच्या माध्यमाने लक्ष वेधून घेतले होते. त्याचप्रमाणे तांबोवा (ता. केज, जि. बीड) येथील विष्णू शेषराव ओव्हळ या अंध गायकांच्या संचानेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांचे विविध गीते आणि स्फुर्ती गीते सादर करुन प्रबोधन केले. 

बाबासाहेबांच्या गीतांमधून स्फुर्ती मिळते. बाबासाहेबांचे गीत सादर करुन प्रबोधन करुन आम्ही उपजिविका भागवतो. चैत्यभूमी मुंबई, दिक्षा भूमी नागपूर, विद्यापीठ नामविस्तार दिन औरंगाबाद यासह विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी आम्ही जातो. बाबासाहेब आणि बुद्धांचे गीत सादर करुन प्रबोधन करतो. 
अंबादास मंडलीक (कलासगार सारथी मंच पुणे) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा