बुधवारपर्यंत जिल्ह्यातील बँका बंद.. हे आहे कारण

प्रकाश बनकर
Sunday, 17 May 2020

तीन दिवस बँका बंद असल्या तरी एटीएमवर पुरेशी रकमेची सुविधा करून देण्यात आली आहेत या सर्व ऑनलाईन बँकिंग च्या सुविधा या सुरू राहणार आहेत. या सुविधा सुरळीत राहावी यासाठी सर्व बँकांचे वरिष्ठ पदाधिकारी लक्ष ठेवून व कार्यरत राहतील. अशी माहितीही श्रीकांत कारेगावकर यांनी दिली.

औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या जवळपास पोचली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने  गेल्या तीन दिवसापासून  शहर व जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला होता.यात आणखी तीन दिवस वाढ करण्यात आली आहे. यामुळे १८ते २० मे दरम्यान शहर व जिल्ह्यातील सर्व बँक बंद राहणार आहे. अशी माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी रविवारी(ता.१७) दिली.

 कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्व तर आजचे प्रयत्न करत आहे. मात्र नागरिक खरेदीसाठी व इतर कारणे देत लॉक डाऊन मोडत आहे. यामुळे गुरुवारी रात्री बारा वाजेपासून ते रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद  पाळण्यात आला.यात आता बुधवारपर्यंत (ता.२०)बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे शहरातील सर्व बँका शुक्रवार व शनिवारी बंद राहतील. अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली.

हेही वाचा- औरंगाबादेत मृत्युचे थैमान 18 तासाच चौघांचा मृत्यू

एटीएमवर ऑनलाइन बँकिंगची सुविधा सुरू 

तीन दिवस बँका बंद असल्या तरी एटीएमवर पुरेशी रकमेची सुविधा करून देण्यात आली आहेत या सर्व ऑनलाईन बँकिंग च्या सुविधा या सुरू राहणार आहेत. या सुविधा सुरळीत राहावी यासाठी सर्व बँकांचे वरिष्ठ पदाधिकारी लक्ष ठेवून व कार्यरत राहतील. अशी माहितीही श्रीकांत कारेगावकर यांनी दिली.

कँटोन्मेंट झोनमधील बँकांच्या शाखा बंद

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यानुसार कोरोना प्रभाव असलेल्या भागातील बॅंकाच्या शाखा २० मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या ५० हुन अधिक शाखा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बंद असलेल्या शाखांमधील कर्मचारी हे इतर शाखांमध्ये पाठवण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 Day Bank Closed Aurangabad News