esakal | CoronaBreaking: औरंगाबादेत मृत्यूचे थैमान, १८ तासांत चौघांचा बळी, आकडा ३० वर
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus Image

बत्तीस वर्षीय तरुणाचा बळी गेल्यानंतर शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) कोरोनाबाधित ७४ वर्षीय पुरुष, ३५ आणि ५२ वर्षीय दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. १६) सायंकाळपासून आज (ता. १७) दुपारपर्यंत चौघांचा मृत्यू झाला तर एकूण ३० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

CoronaBreaking: औरंगाबादेत मृत्यूचे थैमान, १८ तासांत चौघांचा बळी, आकडा ३० वर

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : बत्तीस वर्षीय तरुणाचा बळी गेल्यानंतर शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) कोरोनाबाधित ७४ वर्षीय पुरुष, ३५ आणि ५२ वर्षीय दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. १६) सायंकाळपासून आज (ता. १७) दुपारपर्यंत चौघांचा मृत्यू झाला तर एकूण ३० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

कोरोनाबाधित असलेल्या ३५ वर्षीय महिलेचा आज सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच संजय नगरातील ५२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा १६ मे रोजी सायंकाळी ७ वाजून ४५ ‍मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता.

७४ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रौफ कॉलनीतील ७४ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला.  या रुग्णाला १५ मे रोजी घाटीत भरती झाले होते. शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवले होते. त्यांच्यावर घाटीच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू होते. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आजारही होता, असेही कळवले आहे.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..  

शनिवारी ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
जलाल कॉलनी येथील ३२ वर्षीय तरुणाचा शनिवारी(ता. १६) रात्री ९ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. १५)या युवकास अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या स्वाबचा अहवाल घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह निघाला.

महिला पोलीस पॉझिटीव्ह
मुख्यालयाची महिला कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या पुंडलिकनगर गल्ली नंबर २ या कोरोनाबाधित सील केलेल्या एरियाबाहेर कर्तव्यावर होत्या . दोन दिवसापासून ताप असल्याने तपासणी केली होती. आता बाधित  एक अधिकारी आणि चार पोलिस कर्मचारी उपचार घेत आहेत.

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली   

यासोबतच किलेअर्क येथील रहिवासी व  पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या शिपायाला सात मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. ह्या कर्मचार्‍यास उपचारासाठी  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर हा पोलीस शिपाई शनिवारी (ता. १६) कोरोना मुक्त झाला व त्याना  सुट्टी देण्यात आली.

असा आहे कोरोना मीटर
उपचार घेणार--६०२
बरे झालेले ---३२६
मृत्यू झालेले --३०
एकूण--९५८

ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान