esakal | Coronavirus : औरंगाबादेत आज उच्चांकी ४३८ बाधित, रिसोडच्या रुग्णाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

 438 new case of COVID-19 in Aurangabad District

जिल्ह्यात ४ हजार ५४१ रुग्णांवर उपचार

Coronavirus : औरंगाबादेत आज उच्चांकी ४३८ बाधित, रिसोडच्या रुग्णाचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद :  जिल्ह्यात रविवारी एकाच दिवसात ३९९ जण कोरोना बाधित आढळल्यानंतर आज (ता. २०) यापेक्षाही जास्त तब्बल ४३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्यातील ४ हजार ५४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आतापर्यंत जिल्ह्यातील कारोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या ११ हजार २४१ एवढी झाली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ३०० एवढी आहे. आजपर्यंत एकूण ४०० जणांचा मृत्यू झाला. याशिवाय घाटी रुग्णालयात रिसोड (जि. वाशीम) येथील एका रुग्णाचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 
  
आतापर्यंत ४०१ जणांचा बळी
आज पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्यासह रिसोड (जि. वाशीम) येथील पुरुषाचाही मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील ३९९ जणांचे बळी कोरोना व इतर व्याधींनी गेले असून, रिसोड येथील बाधिताचा एक मृत्यू मिळून ४०१ बळी गेले आहेत. रामगोपालनगर, पडेगाव येथील ४८ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात एक जुलैला भरती करण्यात आले. दोन जुलैला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २० जुलैला पहाटे साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. सिडको एन-सात येथील ५२ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात ४ जुलैला भरती करण्यात आले होते.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दोन जुलैलाच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा २० जुलैला सकाळी पावणेआठच्या सुमारास मृत्यू झाला. बकापूर येथील ४५ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात १६ जुलैला भरती करण्यात आले. १८ जुलैला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा १९ जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला तर शहरातील एका खासगी रुग्णालयात सिटी चौकातील 74 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.  

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग
 
रिसोड येथील पुरुषाचा मृत्यू
रिसोड येथील ४५ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात १५ जुलैला भरती करण्यात आले. १६ जुलैला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २० जुलैला पहाटे साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना किडनी, मधुमेह आदी व्याधी होत्या.
 
कोरोना मीटर 

  • बरे झालेले रुग्ण - ६३०० 
  • उपचार घेणारे रुग्ण - ४५४० 
  • एकूण मृत्यू - ४०१ 
  • आतापर्यंत एकूण बाधित - ११२४१ 

(संपादन : विकास देशमुख)