पाचशे फूट खोल दरीत कोसळला ट्रॅक्‍टर, आणि...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

  • सात मजुरांसह चालकाचा समावेश
  • सोयगाव तालुक्‍यातील सावरखेडा घाटातील घटना 

सोयगाव (औरंगाबाद) : सावरखेडा (ता. सोयगाव) घाटात पाचशे फूट खोल दरीत ट्रॅक्‍टर कोसळून यातील आठजण जखमी झाले. यापैकी पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (ता. पाच) दुपारी साडेतीनच्या सुमारास सावरखेडा घाट उतारावरील एका अवघड वळणावर घडला.

फर्दापूर (ता. सोयगाव) येथील एक ट्रॅक्‍टर सावरखेड्याकडून फर्दापूरकडे येत असताना घाटातील उतारावरील एका अवघड वळणावर ट्रॅक्‍टरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे अनियंत्रित झालेले ट्रॅक्‍टर थेट घाटातील पाचशे फूट खोल दरीत जाऊन कोसळले.

आलिशान गाडीला फासलं शेण आणि त्यातून केली मुलीची पाठवणी

ट्रॅक्‍टर दरीत कोसळल्यानंतर दरीच्या शेवटच्या टोकावर एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या ट्रॅक्‍टरमधून चालक व सात मजूर असे एकूण आठजण प्रवास करीत होते. हे सर्वजण जखमी झाले.

जखमींची नावे खालीलप्रमाणे

यात सलीम भिकन तडवी, साहिल भिकन तडवी, सादिक शेख अत्तार, तौसिफ शेख शफिक, अल्ताफ शेख नजीर हे पाचजण गंभीर झाले, तर सद्दाम शेख मुश्‍ताक, आसिफ रशीद तडवी, शेख रफ्तार शेख शौकत हे किरकोळ जखमी झाले.

लातूरच्या लेखकाचा असाही सन्मान

सोयगाव ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील "घाटी' रुग्णालयात रवाना करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accicent In Savarkheda Soygaon Aurangabad News