esakal | लातूरमधील लेखकाचा सन्मान : विलास सिंदगीकर यांना राज्य सरकारचा पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

लातूरमधील लेखकाचा सन्मान : विलास सिंदगीकर यांना राज्य सरकारचा पुरस्कार

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे दर्जेदार पुस्तकांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार दिले जातात. यात लघुकथा विभागातील दिवाकर कृष्ण पुरस्कार लातूर जिल्ह्यातील लेखक विलास सिंदगीकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

वाङ्‌मय पुरस्काराची घोषणा बुधवारी (ता. ५) मुंबईत झाली. जवळजवळ ३५ लेखकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात लातूरमधील विलास सिंदगीकर यांचाही समावेश आहे. त्यांच्या बाजार या कथासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

वाचा - आलिशान गाडी शेणाने लिंपली आणि त्यातून केली मुलीची पाठवणी

आजवर बाजार या कथासंग्रहाला विविध संस्थांचे १५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे भूकबळी, गारपीट, उतरंड, रक्त आणि भाकर, बाजार असे  पाच कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. गीत निळ्या आकाशाचे, पळसफुलोरा, ढगा ढगा धाव रे, पाऊसझडी, आनंदगाणी, अमृतधारा (काव्यसंग्रह ) हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

नवी उर्जा देणारा पुरस्कार

सिंदगीकर हे मुळचे जळकोट तालूक्यातील केकत सिंदगीचे. त्यांचा जन्म याच गावात झाला. येथील क्रांती माध्यमिक विद्यालयात ते मुख्याद्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आभाळमाया या कवितेचा बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात समावेश झाला आहे. साहित्य अकादमीची साहित्य प्रवासवृत्तीही (फेलोशिप ) त्यांना प्राप्त झाली आहे.

क्लिक करा - उद्योग मंत्र्यांचा आदित्य ठाकरे यांना घरचा आहेर

या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना सिंदगीकर म्हणाले, आजवर माझी ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वाचकांचा त्यांना चांगला प्रतिसादही आहे. अशा टप्प्यावर राज्य सरकारकडून मिळालेला हा पुरस्कार मला अत्यंत महत्वाचा, नवी उर्जा देणारा आहे, असे वाटते.

loading image
go to top