मित्राच्या बायकोचा व्हाटस अपवर मेसेज आला, अन प्रकरण गेलं पाच लाखांवर....पण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अटकेतील आरोपी मनिष आप्पासाहेब निर्मळ (३५, रा. थेरगाव ता. पैठण ह.मु. म्हाडा कॉलनी, मुधलवाडी ता. पैठण) याने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. देशपांडे यांनी फेटाळला. 

औरंगाबाद: कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अटकेतील आरोपी मनिष आप्पासाहेब निर्मळ (३५, रा. थेरगाव ता. पैठण ह.मु. म्हाडा कॉलनी, मुधलवाडी ता. पैठण) याने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. देशपांडे यांनी फेटाळला. 

प्रकरणात मयत वैजीनाथ काळे यांची पत्नी सविता काळे (४०, रा. मुधलवाडी ता. पैठण) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, मयत काळे व आरोपी मनिष निर्मळ हे दोघे एकाच कंपनीत काम करत होते. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. त्यातच आरोपीची पत्नी व काळे यांची ओळख झाली.

हेही वाचा- अल्पवयीन मुलीला पळवून नेले, गर्भवती केल्यानंतर न्यायालयात म्हणाला...

आरोपीच्या पत्नीने आरोपीच्या मोबाइलवरुन वैजीनाथ काळे यांना व्हॉट्स अॅप मेसेज पाठविले होते. ही बाब वैजीनाथ यांनी पत्नी सविता यांना सांगितली. त्यानंतर सविता यांनी आरोपीच्या पत्नीला समज दिली.

१३ जून २०२० रोजी काळे दांम्पत्य घरी असतांना दुपारी आरोपी हा त्यांच्या घरी आला. त्यानंतर काळे व आरोपीच्या पत्नीने एकमेकांना मॅसेज न करण्याचे ठरले. मात्र दुसऱ्या दिवशी आरोपीने वैजीनाथ काळे यांच्याकडे प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाखांची मागणी केली. त्यामुळे काळे यांनी एचडीएफसी बॅंकेत कर्जाची फाइल केली.

हेही वाचा- उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाची अवमान नोटीस, पण कशामुळे?  

मात्र आरोपी मनिष हा काळे यांना वारंवार फोन करुन शिवीगाळ व बदनामी करण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळुन १ जुलै रोजी काळे यांनी कंपनीत गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकरणात एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

जामिन फेटाळला 

पोलिसांनी आरोपी मनिष निर्मळ याला १० जुलै रोजी अटक केली. तर न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केलली. त्यानंतर आरोपीने नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला होता. प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहाय्य केले.

हेही वाचा- आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused Regular Bail Rejected By District Court Aurangabad News