esakal | चार व्यापाऱ्यांवर कारवाई, जीएसटी भरणा करण्यात अनियमितता आढळून आल्याचा संशय
sakal

बोलून बातमी शोधा

2gst_10

वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) भरणा करण्यात अनियमितता आढळून आल्यामुळे राज्यकर जीएसटी कार्यालयातर्फे बुधवारी(ता..२८) जुन्या मोंढ्यातील चार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

चार व्यापाऱ्यांवर कारवाई, जीएसटी भरणा करण्यात अनियमितता आढळून आल्याचा संशय

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) भरणा करण्यात अनियमितता आढळून आल्यामुळे राज्यकर जीएसटी कार्यालयातर्फे बुधवारी(ता..२८) जुन्या मोंढ्यातील चार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात दिवसभर या व्यापाऱ्यांच्या नोंदणी, बील दस्तावेजाची तपासणी आणि व्यवहाराची चौकशी करण्यात आली. यात महत्त्वपूर्ण दस्तावेज अधिकाऱ्यांना सापडले आहेत. त्यांची छाननी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्षीरसागर काका-पुतण्यांत पुन्हा आरोप प्रत्यारोप, भुखंडाच्या बेटरमेंट चार्जवरून राजकारण


जुन्या मोंढ्यातील शेंगदाण्याचे होलसेल व्यापारी अभय ट्रेडिंग व कांती ट्रेडर्स, सुकामेवा व मसालेचे होलसेल व्यापारी दीप ट्रेडर्स, किरणाचे होलसेल व्यापारी तीर्थंकर ट्रेडर्स यांच्यावर ही कारवाई झाली. सांयकाळी सहापर्यंत या अधिकाऱ्यांनी सर्व दस्तावेज तापसणी करण्यात आली. सहाय्यक राज्यकर आयुक्त, राज्यकर अधिकारी अशा ५ ते ७ अधिकाऱ्यांच्या टीमने चारही ठिकाणी कारवाई केली. काही महत्त्वाचे दस्तावेज त्यांच्या ताब्यात आहेत. या कारवाईमुळे इतर व्यापाऱ्यांमध्ये धास्ती आहे. सहा महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प होत्या. आता काही बाजारपेठा सुरळीत येत असताना ही कारवाई झाली आहेत. या तपासणीत सापडलेल्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर या व्यापाऱ्यांनावर व्यापारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.