esakal | क्षीरसागर काका-पुतण्यांत पुन्हा आरोप प्रत्यारोप, भुखंडाच्या बेटरमेंट चार्जवरून राजकारण
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep kshirsagar.jpg
  • क्षीरसागर बंधूंनी ५० लाखांचे शुल्क बुडविल्याचा आरोप.
  • नियमानुसार शुल्क भरल्याचा क्षीरसागरांचा खुलासा.

क्षीरसागर काका-पुतण्यांत पुन्हा आरोप प्रत्यारोप, भुखंडाच्या बेटरमेंट चार्जवरून राजकारण

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : क्षीरसागर काका पुतण्यांतील राजकीय द्वंद सुरु असतानाच इतर मुद्द्यांवरही आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नावे असलेल्या भुखंड विक्रीसाठी नगरपालिकेत ५० लाखांपेक्षा जास्त रुपयांचा बेटरमेंट चार्ज भरला नसल्याचा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याडे रितसर तक्रार केल्यानंतर त्याची सुनावणीही झाली. मात्र, सर्व कामे रितसर केल्याचे क्षीरसागर यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक आठ व नऊ तरफ खोड मळ्यामधील भुखंडाचे क्षेत्रफळ आठ लाख ७५ हजार ५६३ चौरस फुट आहे. सदर क्षेत्राची खरेदी - विक्री करण्यासाठीचा बेटरमेंट चार्ज ५० लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र, त्यांनी याबाबत पालिकेला मागीतलेल्या सवलतीच्या शपथपत्रावर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नसताना सदर शुल्क पालिकेत भरले नसल्याचे संदीप क्षीरसागर यांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याबाबत २९ सप्टेंबरच्या सुनावणीत पालिकेच्या 
जनरलाईज ठरावात मान्यता देण्यात आली. परंतु या ठरावाचे कन्फरर्मेशन नगरपालिकेत सादर नसल्याचे किंवा मागणी प्रमाणे मान्यता देणारे कुठलेही पत्र उपलब्ध नसल्याचे या उघड झाल्याचे संदीप क्षीरसागर सांगतात. भुखंड विकण्यासाठीची प्रक्रीया छाननणी २०११ साली झाली. त्या छाननीचे तीन हजार १५० रुपयांचे शुल्कही भरलेले नाही. भ्रष्टाचाऱ्यांना आपल्याकडे थारा नाही. क्षीरसागर बंधूंच्या प्रत्येक बोगस कामावर आपलं लक्ष राहणार असल्याचे संदीप क्षीरसागरांनी म्हटले. आजपर्यंत जनतेचे जेवढे खाल्ले ते तर वापस घेणारच परंतु जे दोषी आहेत ते तर जेलमध्ये जातीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रसिध्दीसाठी खोटे आरोप; जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न
दरम्यान, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ५० लाख बुडवल्याचा जावई शोध लावत जिल्हाधिकाऱ्यांचा अहवालाचा चुकीचा अर्थ लावून जनतेची दिशाभूल करत क्षीरसागर बंधूंच्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न संदीप क्षीरसागर करत असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. वर्षभरात चमकोगिरी करणाऱ्या आणि फुकटची प्रसिध्दी मिळवणार्‍या आमदाराला बीडकर चांगलेच ओळखून आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मळ्याच्या प्लाटिंगचे बेटरमेंट चार्जेसचे ५० लाख बुडवल्याचा आरोप चुकीचा असून भ्रष्टाचाराबाबत कुठलेही ठोस पुरावे अथवा निकाल नाही. शासनाच्या परिपत्रकानुसार ले आऊट मंजूर झाल्यानंतर सदर प्लॉटचे संबंधीत खरेदीदाराकडून बेटरमेंट चार्ज वसूल करणे बाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतरच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सदर लेआऊटमधील ४२ भूखंड विक्री केल्याचेही म्हटले आहे. नगरपालिकेने एक लाख ११ हजार ८९५ रुपये बेटरमेंट चार्जेसपोटी वसूल केले असून त्याचा उल्लेख अहवालात आहे. लेआऊट मधील भूखंड विक्रीबाबत कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे त्यांचे अहवालात आहे तसेच विकसन फिस पोटी रूपये ३१५० जमा केल्याची पावती देखील अहवालासोबत दाखल आहे. अहवालाचा चुकीचा अर्थ लावून जेवढे पैसे खाल्ले तेवढे वापस घेणारच असे सांगून बीडकरांची सहानुभूती मिळवण्याचा केवीलवाणा प्रयत्न आमदारांकडून केला जात असल्याचा आरोपही नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)