
महापालिकेतील शेकडो पदे रिक्त आहेत. तसेच आहे त्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यापूर्वी अनेकांच्या बदल्या केल्या आहेत. बुधवारी त्यांनी आणखी २२ जणांच्या बदल्या केल्या.
औरंगाबाद : महापालिकेच्या मुख्यालयात अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या २२ अधिकाऱ्यांना प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी धक्का दिला आहे. तब्बल २२ जणांच्या बदल्यांचे आदेश प्रशासकांनी काढले असून, यातील अनेकांना आता मुख्यालय सोडून वॉर्ड कार्यालयात जावे लागणार तर काहींना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
हे ही वाचा : औरंगाबाद-वाळूज रस्त्यावरील रेल्वे पुलावर लेनची शिस्त पाळा ; उद्योग संघटना, पोलिसांचे आवाहन
महापालिकेतील शेकडो पदे रिक्त आहेत. तसेच आहे त्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यापूर्वी अनेकांच्या बदल्या केल्या आहेत. बुधवारी त्यांनी आणखी २२ जणांच्या बदल्या केल्या. यात कनिष्ठ अभियंत्यांपैकी प्रभाग आठचे कृष्णा दौड यांना प्रभाग एकमध्ये कर निर्धारण व कर संकलन विभागात अतिरिक्त काम पहावे लागले.
बी.एम.कानकाटे यांना प्रभाग एकमधून प्रभाग नऊ, एम.आर.राजपूत व दुय्यम आवेक्षक आर.एम.सुरासे यांची प्रभाग दोनमधून अतिक्रमण विभागात, जी.व्ही.भांगे यांना नगररचना विभागासोबतच प्रभाग सहाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दुय्यम अवेक्षक एच.आर.राचतवार यांना अतिक्रमण विभागासोबतच प्रभाग आठचे अतिरिक्त काम देण्यात आले आहे. सारंग विधाते यांची प्रभाग नऊमधून प्रभाग पाचमध्ये बदली करण्यात आली आहे. भरत देवकर यांना प्रभाग दोनमधून तीनमध्ये टाकण्यात आले आहे. अनुरेखक नंदकुमार विसपुते यांना प्रभाग पाचमधून सातमध्ये तर मजहर अली यांना अतिक्रमण विभागासोबत प्रभाग चारची अतिरिक्त जबाबदारी दिली गेली आहे.
हे ही वाचा : ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा
पदाधिकाऱ्यांच्या दालनाला हात
उपमहापौर कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रशांत शहापुरकर यांची प्रभाग सातमध्ये बदली करण्यात आली आहे. बी.डी.फटाले यांना स्थानिक संस्था कर विभागासोबतच प्रभागतीनचे अतिरिक्त काम दिले आहे. प्रभाग सहामधील प्रशांत देशपांडे यांना मालमत्ता विभागाचे अतिरिक्त काम देण्यात आले आहे. महेश नगरकर यांची आस्थापना-मधून विधी विभाग, ललित सूर्यवंशी कोविड वॉररूममधून उपायुक्त दालन, कनिष्ठ लिपिकांमध्ये अशोक भोजने यांची लेखा परिक्षण विभागातून प्रभाग- २, दत्तात्रय केणेकर यांची शहर अभियंता विभागातून प्रभाग सात, नितीन खोकले यांची कोविड वॉररूमधून कर आकारणी विभाग, कृष्णा ठोकळ यांची प्रभाग आठमधून कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, टंकलेखक अनिरूद्ध पाटील यांची शहर अभियंता विभागातून कोविड वॉररूम, मिर्झा अकबर बेग यांची क्रीडा विभागातून प्रभाग सात, अजिम खान यांची खडकेश्वर वाचनालयातून प्रभाग पाचमध्ये बदली करण्यात आली आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले