
औद्योगिक संघटनांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेत हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे उड्डाणपुलाजवळ पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबाद - एमआयाडीसी वाळूजची जीवन वाहिनी मानल्या जाणारे रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावर रोज सकाळी दोन आणि सायंकाळी दोन असे चार तास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा परिणाम थेट औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या कामगारावर होत आहे. ही वाहतूक कोंडी दूर करीत वाहनधारकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी बुधवारी औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी आणि पोलिसांनी थेट रस्त्यावर उतरत जनजागृती केली. आणि ही कोंडी सोडविण्यासाठी नियमावली (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार केली, असल्याचे सीआयआयचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.
हे ही वाचा : हाॅटेलमध्ये तलाठ्याची गळफास लावून आत्महत्या, औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना
औद्योगिक संघटनांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेत हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे उड्डाणपुलाजवळ पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यासह औद्योगिक संघटनाही पोलिसासह रोडवर उतरत वाहनधारकांना वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. समांतर रेल्वे पुलाचे काम लवकरात-लवकर कसे पूर्ण होईल. याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देत हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावेत, अशी मागणीही या औद्योगिक संघटनांनी केली आहे. मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धुत, उपाध्यक्ष, शिवप्रकाश जाजू, सचिव सतीश लोणीकर, बिमटा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद थोरात, मसिआचे सचिव राहूल मोगले, सुमीत मालणी, दिलीप गागुर्डे उपस्थित होते.
हे ही वाचा : दुचाकी चोरी करणाऱ्या खुलताबादच्या टोळीचा पर्दापाश, जिन्सी पोलिसांची कारवाई
अशी केली नियमावली
- औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेले कर्मचारी, अधिकारी शहरातून वाळूजकडे जाताना लेनचा डिसीप्लेन पाळावा.
- यासह कंपन्यांनी सायंकाळी ६ ते ८ या वेळीत शहराकडे परत येणाऱ्या कामगारांच्या वेगवेगळया वेळात जातील असे नियोजन करावेत.
- प्रत्येक कंपनीच्या प्रशासनाने आपल्या कामगारानी अधिकाऱ्यांनी या सूचना घेण्यात यावेत.
- प्रत्येक कर्मचाऱ्यांनी यासह सर्वसामान्य वाहनधारकांनी लेनचा शिस्तीत वापर करावा.
- शहरात जाण्यासाठी कंपन्यांच्या बसेसनी ए.एस कल्बमार्गे पैठण रोड, सुतगिरीणी, उस्मानपुराचा हा पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- ट्रन्स्पोर्टचालकांनी त्यांच्या वाहनधारकास या रेल्वे पुलावरुन जाताना लेनच्या शिस्त पाळावीत. डबल ओव्हरटेक करु नयेत.
संपादन - सुस्मिता वडतिले