औरंगाबादेतून विमानसेवा बंद

प्रकाश बनकर
Monday, 25 May 2020

राज्यात मुंबई, पुणे येथे सेवा सुरू झाली आहे. मात्र औरंगाबादेत कुठलीही सेवा सुरू झालेली नाही. चिकलठाणा विमानतळावरून एअर इंडिया, टूजेट, इंडिगो या कंपन्यांच्या विमानांचे उड्डाण होते. यापैकी कोणत्याही कंपनीने त्यांचे शेड्युल आमच्याकडे दिलेले नाही, असे विमानतळ निदेशक डी.जी. साळवे यांनी सांगितले. 

औरंगाबाद : देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून (ता.२५) सुरू झाली आहे. मात्र, औरंगाबादच्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एकही विमानसेवा सुरू झालेली नाही. विमान कंपन्यांचे कुठलेच शेडूल आमच्यापर्यंत आले नसल्याचे विमानतळ निदेशक डी.जी.साळवे यांनी सांगितले. 

राज्यात मुंबई, पुणे येथे सेवा सुरू झाली आहे. मात्र औरंगाबादेत कुठलीही सेवा सुरू झालेली नाही. चिकलठाणा विमानतळावरून एअर इंडिया, टूजेट, इंडिगो या कंपन्यांच्या विमानांचे उड्डाण होते. यापैकी कोणत्याही कंपनीने त्यांचे शेड्युल आमच्याकडे दिलेले नाही, असे विमानतळ निदेशक डी.जी. साळवे यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

रंगाबाद शहर रेड झोनमध्ये आहे. रुग्णसंख्याही तेराशेच्या पुढे गेली आहे. तर दुसरीकडे उद्योग सुरू करत जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्नही प्रशासनातर्फे केला जात आहे. वाळुज, शेंद्रा येथील मोठे उद्योग सुरू झाले आहे. नवीन उद्योग आणण्यासाठी येथील उद्योग संघटना तसेच एमआयडीसीतर्फे प्रयत्न केले जात आहे. एकीकडे उद्योग सुरू असले तरी दुसरीकडे उद्योगाला पूरक असलेल्या विमानसेवा सुरू नसल्याने याचा गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

विमानसेवा बंद म्हणून मंत्र्यांना वाहनाने नेले मुंबईला 

विमानसेवा सुरू करण्यासाठी येथील राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे कोरोना पॉझिटिव निघाले. त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात येत आहे. नांदेड आणि औरंगाबाद येथील विमानसेवा बंद असल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून वाहनाने मुंबईकडे नेण्यात आले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

आमच्याकडे कुठल्याही विमान कंपनीने त्यांची शेड्युल दिलेले नाही. चिकलठाणा विमानतळ प्राधिकरण सज्ज आहे. कंपन्यांचे शेड्युल आल्यावर उड्डाण होईल. अद्याप कुठलीही विमानसेवा औरंगाबादेतून सुरू झालेली नाही. 
-डी. जी. साळवे, विमानतळ निदेशक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Airlines from Aurangabad closed