अजिंठा-वेरुळ बंद : भद्रा मारुती मंदिरातही शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 March 2020

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी (ता. १६) जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अजिंठा-वेरुळ, बीबी का मकबऱ्यासोबतच जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थानेही बंद करण्यात आली आहेत. 

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी (ता. १६) जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अजिंठा-वेरुळ, बीबी का मकबऱ्यासोबतच जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थानेही बंद करण्यात आली आहेत. 

मागील दहा दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. दुसरीकडे मात्र मॉल, सिनेमागृहे, हॉटेल, सार्वजनिक ठिकाणी होणारे कार्यक्रम यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता पर्यटन केंद्रही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अखत्यारीत असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ या जागतिक वारसा स्थळांवर जगभरातून पर्यटक येत असतात. मात्र कोरोनाचे सावट पसरल्यापासून या स्थळांवर शुकशुकाट पसरला होता. जिल्हा प्रशासनानेही गर्दीची स्थळे बंद करण्याचे आवाहन केले होते. पुरातत्त्व खात्याच्या स्मारक विभागाचे संचालक डॉ. अरविंद मंजुळ यांनी मंगळवारी दिल्लीतून ही सर्व स्थळे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. 

देवस्थानांना लागली कुलुपे

वेरूळ येथील घृष्णेश्वर, खुल्ताबाद येथील भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी केवळ राज्यातूनच नाही, तर देशभरातून भाविक हजारोंच्या संख्येने येत असतात. भद्रा मारोती मंदीर तर दर शनिवारी गर्दीने फुलून जाते. परंतु आता या गर्दीलाच आळा घालण्यासाठीच भद्रा मारोती मंदीराला कुलुप लावण्यात आले आहे. 

खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....

शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी सकाळी भद्रा मारोती संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मंदीराला कुलूप लावले. आता पुढील आदेश येईपर्यत हे मंदीर भाविकांसाठी बंद राहणार आहे. याचबरोबर औरंगाबाद शहरातील वरद गणेश मंदिरासह अनेक देवस्थाने बंद करण्यात आली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajanta Ellora Caves Closed Due To CoronaVirus Aurangabad Tourism News