esakal | विधान परिषद : अजित गोपछडेंच्या नावाने निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून नांदेड येथील डाॅ. अजित गोपछडे यांच्यासह इतर चार जणांच्या नावाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मात्र या यादीत डाॅ. गोपछडे यांच्या नावाचा उल्लेख ऐकून खुद्द पक्षातील निष्ठावंतांनाच जबरदस्त असा धक्का बसला आहे.

विधान परिषद : अजित गोपछडेंच्या नावाने निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या...

sakal_logo
By
दयानंद माने

औरंगाबाद : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून नांदेड येथील डाॅ. अजित गोपछडे यांच्यासह इतर चार जणांच्या नावाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मात्र या यादीत डाॅ. गोपछडे यांच्या नावाचा उल्लेख ऐकून खुद्द पक्षातील निष्ठावंतांनाच जबरदस्त असा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता या शक्तीबळावर आपले तीन आमदार नक्की निवडून येतील, अशी शक्यता आहे. मात्र, भाजपने चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्याने निवडणूक अटळ आहे. भाजपमधील उमेदवारीच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेल्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे व चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलून पक्षाने अत्यंत नवख्या असलेल्या तरूणांना संधी दिली आहे. त्यातही सध्या विधानपरिषदेचे तिकीट वाटप करताना 'सोशल इंजिनिअरिंग' नावाचे फॅड सर्वच पक्षांनी अंगिकारल्याने अनेक निष्ठावानांना हात चोळत बसावे लागत आहे. अशाच काहीसा प्रकार झाला आहे.

क्षणार्धात संपले, सोळा मजुरांना रेल्वेने चिरडले : जबाबदार कोण...

नांदेडचे डाॅ. अजित गोपछडे हे शहरातील एमडी डाॅक्टर असून, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. त्यातून रा. स्व. संघाशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. तसेच, मागच्या भाजपच्या सत्ताकाळात त्यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशीही चांगले संबंध राहिले आहेत. मात्र पक्षात कार्यकर्ता म्हणून त्यांचे काम फारसे चांगले नसून ते लिंगायत समाजाचे असल्याने 'सोशल इंजिनिअरिंग'च्या बळावर त्यांची लाॅटरी लागल्याची चर्चा नांदेडात आहे.

रेल्वे अपघातात 16 मजूर ठार, पायी गावाकडे निघाले होते

ते पक्षाच्या डाॅक्टर्स आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत. मराठवाड्यात भाजपने विधान परिषद व राज्यसभेचे उमेदवार निवडताना एकदम धक्के देण्याचा पायंडा सुरू केला आहे. या आधी ध्यानीमनी नसताना नांदेडच्याच राम पाटील पाटील रातोळीकर यांना संधी दिली होती. आता त्याच नांदेड जिल्ह्यात गोपछडे यांच्या रूपाने दुसरा विधान परिषद आमदार लाभण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्ये ५० कोरोना हॉटस्पॉट, कोणते ते वाचा

त्यानंतर गेल्याच महिन्यात राज्यसभेवर मराठवाड्यातून डाॅ. भागवत कराड यांना अशीच अनपेक्षित अशी संधी देण्यात आली आहे. तर आता तिसर्‍यांदा असा अनपेक्षित निर्णय झाला आहे. रातोळीकर, कराड, गोपछडे यांच्यासारखी लाॅटरी आपणासही लागू शकते, असा भाबडा विश्वास बाळगून पक्षात क्रियाशील व्हायला अनेक डाॅक्टरांना भाजपमध्ये चांगली संधी आहे, असे गंमतीने म्हटले जात आहे. निष्ठावंतांच्या नशिबी मात्र पुन्हा एकदा कठोर तपश्चर्येचाच मार्ग आहे, असे म्हणायला हवे. 

आता पंकजा मुंडेंच्या रूपाने आणखी एक आमदार बीड जिल्ह्याला मिळणार व मुंडे बहीण भावांचे थंडावलेले वाक्युद्ध पुन्हा राज्याला पाहायला मिळणार, अशा विचारात राजकीय पंडित असतानाच त्यांनाच धक्का देणारा हा निर्णय झाला आहे.

go to top