esakal | CoronaVirus : क्षणार्धात संपले, सोळा मजुरांना रेल्वेने चिरडले : जबाबदार कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

photo

पोलिसांच्या धास्तीने रेल्वे पटरी मार्गाने निघाले 
क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.  
अंगावर शहारे आणणारी घटना,

CoronaVirus : क्षणार्धात संपले, सोळा मजुरांना रेल्वेने चिरडले : जबाबदार कोण?

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : लॉकडाऊनच्य परिस्थितीमुळे  जालना औद्योगिक वसाहतीतील एका स्टील कंपनीतील वीस मजूर रेल्वे पटरीने मार्गे पायी-पायीच मध्यप्रदेशात जाण्यासाठी भुसावळकडे निघाले होते. शुक्रवारी (ता. आठ) पहाटे सव्वापाच वाजता हे मजुर विश्रांतीसाठी म्‍हणुन करमाड जवळील सटाना गावाच्या शिवारात रेल्वे पटरीवर बसले. मात्र थकव्यामुळे त्यांना काही क्षणात झोप लागली. त्याचवेळी एका मालगाडीने सर्व मजुरांना चिरडले. यामध्ये सोळा जणाचा अक्षरश: चिरडून ठार झाले. दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यातील हे मजूर चंदनझिरा परिसरात रहात होते. ते जालना औद्योगीक वसाहतीतील एका स्टील कंपनीत कामाला होते. वीस जण गुरुवारी (ता. सात) संध्याकाळी सात वाजता जालण्याहून रल्वे पटरी मार्गाने औरंगाबाद, मनमाड मार्गे भुसावळकडे जाण्यासाठी निघाले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काही वेळातच त्यांना झोप लागली

औरंगाबाद तालुक्यातील करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सटाणा गावाच्या हद्दीत सर्वजण विश्रांतीसाठी रेल्वे रूळावर बसले. काही वेळातच त्यांना झोप लागली. त्यावेळी जालना येथून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल-पेट्रोलच्या गाडीने मजुरांना चिरडले. या दुर्घटनेत यात सोळा जण जागीच ठार झाले. दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशी माहिती पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

क्षणार्धात सर्व काही संपले

रेल्वे मालगाडीने क्षणार्धात सर्व मजुरांना चिरडले, ही घटना इतकी विदारक होती की सर्व मृतदेहांचे तुकडे झाले. हात एकीकडे, पाय एकीकडे, धड दुसरीकडे अशी अवस्था होती. या मजुरांच्या बॅग, पिशव्या. चपला बुट, पाकीट विखुरले होते. अर्धा किलोमीटरच्या परिसरात संपूर्ण मृतदेहाचे तुकडे झालेले होते. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मदत कार्याला तीन तास 

सकाळी सव्वापाच वाजता घटना घडली होती. मात्र जवळच असलेलेल करमाड पोलिस घटनास्थळी उशीरा पोहचल्याचे स्थानिकांनी सांगीतले. करमाड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमलस व त्यांच्या सहकाऱ्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सव्वा पाच वाजता अपघात झालेला होता. साडे आठ वाजेपर्यंत मृतदेहाचे तुकडे गोळा करण्याचे काम सुरू होते. स्थानिक कुंभेफळ येथील ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह एकत्र करून ट्रक (क्र. एमएच-२०-ईएल-४४७४) या ट्रक द्वारे घाटी रुग्णालयात पोहोचविले.

घटनास्थळी मदत कार्य

घटनास्थळी आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही भेट दिली तसेच जिल्हाधिकारी उदय चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अरविंद शर्मा, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप साबळे यांच्यासह ग्रामीण पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने  मदतीने सुरक्षा बलाचे कर्मचारी घटनास्थळी मदत कार्य केले. 


जालना येथे स्टील कंपनीत मजुरांना कामासाठी आणलेल्या ठेकेदाराने कंपनीच्या मालकाच्या मदतीने सर्व कामगारांना परत जाण्यासाठी परवाना काढून देणे आवश्यक आहे. सरकारनेही आपल्या गावी जाऊ इच्छित असलेल्या मजुरांना रीतसर सर्व व्यवस्था करुन पाठविण्याची गरज आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. 
हरिभाऊ बागडे (आमदार तथा विधानसभा माजी अध्यक्ष)