अकबरुद्दीन ओवेसी यांचा औरंगाबाद दौरा रद्द, कारण वाचाल तर...

शेखलाल शेख
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकबरुद्दीन ओवेसी यांच्या २९ रोजीच्या दौऱ्याकडे बघितले जात होते. परंतु राज्यात आणि देशात सीसीएस आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले वातावरण....

औरंगाबाद : एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी येत्या २९ फेब्रुवारी रोजी औरंगाबादेत सभा घेणार होते. या दौऱ्यातून महापालिका निवडणूक प्रचाराची सुरवात करण्यात येणार होती. मात्र अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रकृतीचे कारण पुढे करत सध्या हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

आता मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यांची सभा घेतली जाईल अशी माहिती एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी ‘सकाऴ’ शी बोलतांना दिली.

हेही वाचा- मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकबरुद्दीन ओवेसी यांच्या २९ रोजीच्या दौऱ्याकडे बघितले जात होते. परंतु राज्यात आणि देशात सीसीएस आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले वातावरण, दिल्लीत भडकलेली दंगल, वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्त्यव्य या घटना सुद्धा दौरा पुढे ढकलण्यास कारणीभुत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. 

यासंदर्भात एमआयएमचे कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनी नुकतीच दौरा रद्द झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. कादरी म्हणाले , अकबरुद्दीन औवेसी हे २९ रोजी एका सीबीएससी शाळेच्या भूमिपूजनासाठी औरंगाबादेत येणार होते . तसेच या निमित्ताने शहरात त्यांची एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा- पुन्हा एका बालिकेवर अत्याचार.. वाचा कुठे

 

परंतु त्यांची तब्येत बिघडल्यामुळे नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला आहे .मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादेत येतील आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील असेही कादरी यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

सध्या एमआयएमकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत. तसेच अनेक इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरु केल्याने एमआयएमने प्रचारात आघाडी घेण्याच्या दृष्टीने नेत्यांच्या सभेचे नियोजन केले. मात्र त्यांना सभा पुढे ढकलावी लागली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akbaruddin Owaisi Election Campaign Canceled Aurangabad News