VIDEO : कोरोना बाधितासोबत नेले, तोही झाला बाधित, तरुणाची आपबिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

आता पॉझिटिव्ह आलो आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत, याला केवळ प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप एका बाधितने केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 

औरंगाबाद :  ''शहरातील संजयनगर भागात एक कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांना एकाच वाहनातून रुग्णालयात नेले. त्यामुळे बाधित झालो'', असाआरोप एका व्यक्तीने केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
संबंधित व्यक्तीने सांगितले की, ''आमच्या शेजारी राहणारी व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला एकाच वाहनातून बसून नेत रुग्णालयात अलगीकरण केले. ज्या ठिकाणी आम्हाला ठेवले त्याठिकाणी कोरोना बाधितांचे नातेवाइकांनाही ठेवले होते. तपासणीनंतर त्यांचा कोविड-१९ चा अहवाल निगेटिव्ह आला. पण, मी आता पॉझिटिव्ह आलो आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत, याला केवळ प्रशासन जबाबदार आहे'', असा आरोप एका बाधितने केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 

विलगीकरण कक्षात सोयी-सुविधा द्या
माजी नगरसेवक तथा  बहुजन आघाडीचे पश्‍चिम शहर उपाध्यक्ष कृष्णा बनकर म्हणाले, ''भीमनगर-भवसिगपुरा येथील कोरोन बाधित महिलेच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिचा कोरोना चाचणीचा अहवाल आला. तोपर्तंय तिचे अंत्यसंस्कार झाले होते. या घटनेला घाटी प्रशासन जबाबदार आहे. कोरोना बाधित संशयित महिला असेही सांगितले असते, तर लोक इतक्या मोठ्या संख्येने आले नसते. दुसरी गोष्ट सध्या विलगीकरण कक्षात गेल्यानंतर कोरोना होतो. अलगीकरण कक्षात कोरोना बाधित रुग्णांनाही ठेवले जाते अशी काहीशी भावना असल्यामुळे लोक तोंड लपवून पळत आहेत. विलगीकरण कक्षामध्ये पुरेसा आहार दिला जात नाही.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

लहान मुले आहेत त्यांना दूध बिस्किट असा आहार दिला जात नाही. या सर्व बाबी असल्यामुळे नागरिक तपासणीसाठी तयार होत नाहीत, असे नागरिकांबरोबर बोलल्या नंतर लक्षात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने अलगीकरण कक्षात सर्व सोयी सुविधा द्याव्यात या कक्षात कोरोना बाधित रुग्ण असता कामा नये, त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या घाटी रुग्णालय प्रशासनातील डॉक्टर व संबंधितांना निलंबत करावे'', अशी मागणीही बनकर यांनी केली. 

ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला
 
 

कोरोना विरुद्ध उपाययोजना करताना अंदाज न आल्याने प्रशासनाच्या सुरवातीला काही चुका झाल्या. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले नागरिक सुरवातीला महापालिकेला सहकार्य करण्यास तयार नव्हते. त्यामुळे क्वारंटाईनसाठी कमी लोक सोबत यायचे. म्हणून आम्ही टाटा सुमो जीप वापरल्या. नागरिकांचा प्रतिसाद वाढल्याने रुग्णवाहिका व आता शहरबसचा वापर केला जात आहे. एका सीटवर एकच जण तोही क्रॉस पद्धतीने बसविला जातो. प्रत्येक बस निर्जंतुक केली जाते. तीन-चार दिवसांत अचानक रुग्ण वाढल्याने यंत्रणेवर ताण पडला. कोरोना महामारी आहे. अचानक आलेल्या संकटाशी सामना करताना थोडी तारांबळ उडतेच. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची आम्ही काळजी घेत आहेत. जीवाची पर्वा न करता महापालिकेची  संपुर्ण टीम काम करत आहे.
- अॅड. अपर्णा थेटे, टास्क फोर्स प्रमुख.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegation of corona infected patient Aurangabad News