मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या धर्तीवर ‘अमेझिंग औरंगाबाद’ला वेग

Announcement of "Amazing Aurangabad" on the lines of Magnetic Maharashtra
Announcement of "Amazing Aurangabad" on the lines of Magnetic Maharashtra

औरंगाबाद  : जगभरातील मोठी गुंतवणूक डीएमआयसीच्या ऑरिक सिटीत आणण्यासाठी शासनातर्फे मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या धर्तीवर ‘अमेझिंग औरंगाबाद’चा नवीन उपक्रम सुरू केला आहे. राज्य शासन, डीएमआयसी आणि सीएमआयए आणि इतर औद्योगिक संघटनांना एकत्र करून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे देशपातळीवर मेक इन इंडिया, राज्यपातळीवर मॅग्नेटिक महाराष्ट्र तसेच औरंगाबादमध्ये उद्योग आणण्यासाठी ही नवी संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून या उपक्रमाचे नियोजन सुरू होते. सीएमआयए व संबंधित अधिकाऱ्यांच्या याविषयी मुंबईत बैठका झाल्या. मात्र, कोरोनामुळे ‘अमेझिंग औरंगाबाद’चे काम मागे पडले होते. या आठवड्यात उद्योगमंत्री देसाई शहरात येणार आहेत. त्यावेळी यासंदर्भात बैठक होण्याची शक्यता सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या उपक्रमातून प्रदर्शने, सेमिनार अशा विविध माध्यमांचा उपयोग केला जाणार आहे.

नव्या उद्योगासाठी ऑरिक सिटीत दहा हजार एकर जागा तयार आहे. याच ऑरिक सिटीतून शेंद्रा-बिडकीन कॉरिडॉर हा भव्य प्रकल्प २५ हजार एकरांवर उभा राहणार आहे. त्यापैकी दहा हजार एकर जागेचे अधिग्रहण झाले असून पुढील कामे सुरू आहेत. बिडकीन आणि शेंद्रा येथे उद्योगांना लागणाऱ्या बहुतांश सुविधांचे काम पूर्ण झाले आहे. त्याचेच दर्शन अमेझिंग औरंगाबादमधून मांडण्यात येणार आहे. 

नवीन उद्योगांची चाचपणी 
ऑरिकमध्ये आॅटोमोटिव्ह, आॅटो कंपोनंट, औषधी कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स, फूड, ब्रेव्हरेज, टेक्सटाईल या कंपन्या येऊ शकतात. आतापर्यंत घरगुती वापरासाठी विविध उत्पादने करणारा आरबी ग्रुप गुंतवणुकीस इच्छुक आहे. तर रशियाच्या ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) कंपनीने जमीन मिळवली असून पहिला फेज सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. 

‘अमेझिंग औरंगाबाद’चे काम सुरू झाले होते मात्र कोरोनाच्या परिस्थितीत काही काळ थांबले होते. डिसेंबर महिन्यात प्रमोशनचे काम सुरू होईल. या सगळ्यांचे नियोजन सुरू आहे. या आठवड्यात उद्योगमंत्री शहरात येतील, तेव्हा याबाबत बैठक होऊ शकते. 
- कमलेश धूत, अध्यक्ष, सीएमआयए 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com