हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्ती

अतुल पाटील
शनिवार, 23 मे 2020

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातूनच निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. तसेच उत्तराधिकारी सौभाग्यवती संजना जाधव असेल, तिच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा राहील. असे त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

औरंगाबाद : राजकारणात नेहमीच अनपेक्षित निर्णय घेतात म्हणून माजी आमदार हर्षवर्धन जाधव प्रसिद्ध आहेत. मात्र, आजचा त्यांचा निर्णय धक्कादायक असाच आहे. जाधव यांनी राजकारणातूनच निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. तसेच उत्तराधिकारी सौभाग्यवती संजना जाधव असेल, तिच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा राहील. असे त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी जारी केलेल्या व्हिडीओत म्हटले कि, "नमस्कार मित्रांनो! लॉकडाऊन सुरू आहे. आपण सर्वजण आपापले छंद जोपासतो आहे. मीही माझ्या अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आणि त्यातून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो. त्या कितपत खऱ्या आहेत. याची जाणीव मला झाली. आणि म्हणून मी निर्णय घेतला की, आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. 

Covid warriors : चिमुकलीला बाधा, पण कोरोनालाही घाबरलं नाही आईचं काळीज 

माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी ही सौभाग्यवती संजना जाधव असेल आणि आपणाला ज्यांना पण जे ही प्रश्न असतील, ते प्रश्न संजनाकडून सोडवून घ्यावे. अशी विनंती मी करतो. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात, आमच्याही घरी झाल्या. याचा अर्थ असा नाही कि, त्याठिकाणी काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत असतील. निश्चितच मीसुद्धा संजनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे.

रायभान जाधव साहेबांचा आशिर्वादाने आणि महाराष्ट्राचे नेते केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना उत्तुंग भरारी मारेल. याच्याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. आपण कृपया सर्वजणांनी राजकीय, सामाजिक किंवा शासकीय मदतीसाठी सौ संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा. ते सगळे फोन उचलतात. ही हे आपल्याला नम्रतेची विनंती याठिकाणी करतो. मीही तिच्यामागे खंबीरपणे उभा आहे. धन्यवाद!

इस साल धंदा बहुत यानी बहुत मंदा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement of political retirement from Harshavardhana Jadhav