मेहबूब शेख प्रकरणी पीडित तरुणीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा - निलम गोऱ्हे

ई सकाळ टीम
Tuesday, 5 January 2021

औरंगाबाद येथील बलात्कार प्रकरणीतील मेहबूब शेख याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील बलात्कार प्रकरणीतील मेहबूब शेख याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात त्या म्हणतात, की पीडित तरुणीने दिलेला तिचा पत्ता चुकीचा होता. त्याच्यामुळे काहीच पत्ता लागत नाहीये. पाठपुरावा करता येत नाही. त्या पुढे म्हणतात, की मी या घटनेत माध्यमातून दोन गोष्टींकडे आपले लक्ष वेधते. एक म्हणजे ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील या वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे किंवा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे पीडितेने संपर्क साधावा, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले आहे.

शरद पवारांनी दिली संदीप क्षीरसागर यांना 'लिफ्ट'

पुढे त्या म्हणतात, की त्यांनाही ही भेटणे अवघड झाले तर शिवसेनेचे पदाधिकारी रेणुकादास राजू वैद्य (सभापती, मनपा तथा शिवसेना विधानसभा संघटक), औरंगाबादेत आहेत. पीडित तरुणीने स्वतः संपर्क साधावा किंवा याबद्दल काही माहिती असेल तर त्यामध्ये वेगवेगळे बातम्यांतून फक्त भूमिका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष तिच्यापर्यंत पोलिसांना पोचून काय ते वस्तुस्थिती समोर येऊ शकेल. या प्रकरणातील पीडितेने ज्यावेऴेला घरी येऊ नये सांगितलं गेले तेही बरोबर आहे. कारण काही वेळेला पोलिस पोचल्यावर सगळ्यांना कळत हीच ती तक्रारदार तरुणी आहे. परंतु त्याच्या पूर्वीही तिने काही अशा तक्रारी केल्या असतील तर त्यामध्येही निःपक्षपातीपणाने तपास होण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी लक्ष घातले पाहिजे. मला अस निश्चितपणे वाटते, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात शेवटी म्हटले आहे.   

औरंगाबाद रेल्वेस्थानकाला पोलिस संरक्षण, नामांतरासाठी मनसेकडून आंदोलनाची शक्यता

मेहबूब शेख यांच्याविरुद्ध तांत्रिक पुरावा आढळला नाही ः औरंगाबादेतील पीडित महिलेच्या चर्चित बलात्कार प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासासमोर आला आहे. पीडितेने संशयिताविरुद्ध तक्रार दिली; परंतू तक्रारीनुसार, महेबूब शेख यांच्यासबंधित कोणतेही तांत्रिक पुरावे समोर आले नाहीत. तसेच महेबूब शेख व पीडितेचे टॉवर लोकेशनही एक नसल्याची बाबही समोर आली. या प्रकरणात तीन पथके तपासकार्य करीत आहे व तपासही सहायक पोलिस आयुक्तस्तरावर देण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी ता.३१ डिसेंबर रोजी दिली. औरंगाबादेतील सिडको पोलिस ठाण्यात २९ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, मुंबईत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ट्यूशन घेणाऱ्या शिक्षिका तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दिली.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assaulted Girl Should Contact With Senior Officers, Neelam Gorhe Said