esakal | औरंगाबाद रेल्वेस्थानकाला पोलिस संरक्षण, नामांतरासाठी मनसेकडून आंदोलनाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Railway Station

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सरकारला 26 जानेवारीपर्यंत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचे अल्टिमेटम देण्यात आला आहे.

औरंगाबाद रेल्वेस्थानकाला पोलिस संरक्षण, नामांतरासाठी मनसेकडून आंदोलनाची शक्यता

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सरकारला 26 जानेवारीपर्यंत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचे अल्टिमेटम देण्यात आला आहे. राज्यातील नाशिक व पालघर येथील बसस्थानकातून औरंगाबादकडे येणाऱ्या बसेसच्या पाट्या बदलून संभाजीनगर करुन आंदोलन करण्यात आले आहे. या प्रकारचे आंदोलन  औरंगाबादेत होऊ शकते. याचा विचार करुन शहर पोलिसांतर्फे येथील रेल्वेस्थानकातील औरंगाबाद नामफलकाला  मंगळवारी (ता.पाच) संरक्षण देण्यात आले आहे.

शरद पवारांनी दिली संदीप क्षीरसागर यांना 'लिफ्ट'

काँग्रेस, आरपीआयचा विरोध : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे संभाजीनगरला नावाला विरोध असेल. उलट विकासाच्या राजकारणाला पक्षाचे अग्रक्रम राहिल असे त्यांनी सांगितले होते. त्यांचीच रि ओढत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनीही नाव बदलण्यास विरोध केला आहे. त्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष (गट आठवले) तथा केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही औरंगाबादच्या नामांतरास विरोध दर्शवला आहे. 

संपादन - गणेश पिटेकर