esakal | रिझर्व्ह बँकेच्या नियमाला बँकांचा "खो'
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एटीएम वर पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात. यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून दर दोन तासाला एटीएमची स्वच्छता करावी, अशा सूचना बँकांना देण्यात आले आहेत मात्र बँका या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही.

रिझर्व्ह बँकेच्या नियमाला बँकांचा "खो'

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: कोरोना व विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिझर्व बँकेने बँक बँकांना काळजी घेण्याचे सूचना दिल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिट्झर कॅशियरने हॅन्ड ग्लोज वापरावे व एटीएम दर दोन तासाला सॅनिट्झरने स्वच्छ करावे अशा सूचना केल्या आहेत. मात्र शहरातील सर्वच एटीएमवर कुठली स्वच्छता करण्यात आलेली नाही. यामुळे रिझर्व्ह बँकेने केलेल्या सूचनांकडे शहरातील बँका दुर्लक्ष करीत आहे. 

एटीएम वर पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात. यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून दर दोन तासाला एटीएमची स्वच्छता करावी, अशा सूचना बँकांना देण्यात आले आहेत मात्र बँका या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही. एटीएम ची जबाबदारी ही काही ठेकेदारांना दिल्यामुळे, त्या ठेकेदारांकडून एटीएमची स्वच्छता करण्यात येत नाही. यामुळे बहुतांशी एटीएम हे अस्वच्छ आहेत यासह या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्याता आहे. 

हेही वाचा : हातावर शिक्का असलेला पाहुणा आला अन उडाला गोंधळ

ठेकेदाराचे दुर्लक्ष

हा विषाणू हा थंड ठिकाणी जास्त असतो असे डॉक्टर सांगतात. प्रत्येक एटीएमवर एसी लावण्यात आल्यामुळे या विषाणू येथे जास्त काळ टिकून राहतो. यामुळेच रिझर्व्ह बँकेने दर दोन तासाला एटीएम सॅनिट्झर ने स्वच्छ करण्याच्या सूचना बँकांना केले आहेत. मात्र याकडे बँक आणि एटीएमचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

एखादा कोरोना विषाणूचा बाधित रुग्ण एटीएम वर गेल्यास त्याचा प्रसार सर्वत्र होण्याची दाट शक्यता आहे.यामुळे आपण एटीएम मध्ये जात असाल तर सावधान रहा एटीएम वर पैसे काढल्यानंतर त्यांनी सॅनिट्झर ने हात स्वच्छ करा. अन्यथा आपल्याला ही अशा विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.