esakal | दर दोन तासाला होईना एटीएमची स्वच्छता
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसारबँकांनी एटीएम दर दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचे निर्देशही देण्यात आले असतानाही कुठल्याच बँका व ठेकेदारांतर्फे एटीएमची स्वच्छता करण्यात येत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.

दर दोन तासाला होईना एटीएमची स्वच्छता

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार कर्मचारी मास्क, सॅनिटायझर, हॅंड ग्लोव्हज वापरत आहेत. एका वेळी केवळ चारच ग्राहकांना बँकेत सोडले जात आहे. सोशल डिस्टन्स पाळला जात आहेत. यासह बँकांनी एटीएम दर दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचे निर्देशही देण्यात आले असतानाही कुठल्याच बँका व ठेकेदारांतर्फे एटीएमची स्वच्छता करण्यात येत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. 

एटीएमवर पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात. यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून दर दोन तासाला एटीएमची स्वच्छता करावी, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत; मात्र बँका या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

एटीएमची जबाबदारी काही ठेकेदारांना दिल्यामुळे, त्या ठेकेदारांकडून एटीएमची स्वच्छता करण्यात येत नाही. यामुळे बहुतांशी एटीएम हे अस्वच्छ आहेत यासह या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्याता आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्रत्येक एटीएमवर एसी लावण्यात आल्याने विषाणू येथे जास्त काळ टिकून राहू शकतो. यामुळेच रिझर्व्ह बँकेने दर दोन तासाला एटीएम सॅनिटायझरने स्वच्छ करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत. मात्र, याकडे बँक आणि एटीएमचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत. एखादा कोरोना विषाणूचा बाधित रुग्ण एटीएमवर गेल्यास त्याचा प्रसार सर्वत्र होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आपण एटीएममध्ये जात असाल तर सावधान राहा. एटीएमवर पैसे काढल्यानंतर त्यांनी सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.