शिवीगाळ करत एसटीवर सामूहिक हल्ला, चालक-वाहकास बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news
  • कन्नड शहरातील घटना
  • अठरा जणांवर गुन्हा दाखल
  • तिघांना घेतले पोलिसांनी ताब्यात 

शिवीगाळ करत एसटीवर सामूहिक हल्ला, चालक-वाहकास बेदम मारहाण

कन्नड (बातमीदार) : कन्नडहून शिरपूरकडे जाणाऱ्या बसला अडवून सामूहिक हल्ला करण्यात आल्याची घटना कन्नड तालुक्यात घडली. हल्लेखोरांनी काठ्या-दगडांनी बस फोडली आणि चालक व वाहकाला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. 

चालकासह वाहकाला बेदम मारहाण करणाऱ्या अठरा जणांविराधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे. 

नेमके काय झाले... 

औरंगाबाद-शिरपूर ही एसटी महामंडळाची बस औरंगाबाद येथून शिरपूरकडे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास निघाली होती. औरंगाबाद-नाशिक रस्त्यावरील हॉटेल आम्रपालीजवळ बसने मारुती स्विफ्ट कारला हूल दिल्याचे कारण करून बसला अडविण्यात आले. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

हल्लेखोरांनी चालकासह वाहकाला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत बसचालकाच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. तर बस वाहकाच्या हातातील ६१६५ रुपये भांडणात हिसकावून घेतले. काठीने बसच्या समोरील काचा फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

बसचालक सुधाकर श्‍यामराव शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अलीम मकबल शाह, स्विप्टचा चालक रिजवान सलीम शेख (रा. मेहताबनगर, कन्नड) याच्यासह इतर सोळा लोकांविरुद्ध कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह

Web Title: Attack Bus Kannad Aurangabad News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top