BharatBandh : भारत बंदला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

प्रकाश बनकर
Tuesday, 8 December 2020

भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सोमवारी (ता.७) प्रसार माध्यमांना दिली. याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली.

औरंगाबाद : भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सोमवारी (ता.७) प्रसार माध्यमांना दिली. याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या प्रसिध्दीपत्रका म्हटले आहे की, मराठा आरक्षण हा प्रश्न समोर येण्याचे मुख्य कारण शेतीच आहे. ८० टक्के मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. हमी भाव नसल्याने शेतकरी बांधवांचे नुकसान होते. यामूळे दैनंदिन गरजा सोबत मुलांचे शिक्षण हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने मराठा आरक्षणाची मागणी समोर आली आहे. मराठ्यांना आरक्षण आणि शेतकऱ्यांना स्वरक्षण व स्वामिनाथन आयोग लागू करावा हे विषय महत्वाचे असल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निघाले.

BharatBandh : औरंगाबाद शहरातील अर्धेअधिक व्यापारी आस्थापना राहणार बंद

बैठकीत समन्वयक चंद्रकांत भराड, किशोर चव्हाण, सुरेश वाकडे, राजेंद्र दाते पाटील, शिवानंद भानुसे, सतिश वेताळ, मनोज गायके, रमेश गायकवाड, प्रदिप हार्दे, रेखा वहाटूळे,सुकन्या भोसले, रेणुका सोमवंशी, आत्माराम शिंदे, शिवाजी जगताप, गणपत म्हस्के, अंकत चव्हाण, योगेश औताडे, अमोल साळुंके, विलास औताडे, अजय गंडे, चंद्रशेखर निकम, अनिल पोळ, वैभव बोडखे, विशाल वेताळ,अनिल तुपे, सुभाष सुर्यवंशी, संजय जाधव, रविंद्र वाहटुळे यांचा समावेश होता.

 

Edited - Ganesh Pitekar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Support Bharat Bandh Aurangabad News