ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!

मधुकर कांबळे
Wednesday, 24 June 2020

कुटुंबवत्सल धनेश पक्षी तिच्यासह पिल्लांना भरवितो तीन महिने खाद्य 

औरंगाबाद : करडा रंग, लांब चोच, चोचीवर शिंगासारखा टोकदार अवयव असा झाडाच्या खोडावर टकटक करीत बसणारा धनेश पक्षी कुटूंबवत्सल म्हणून ओळखला जातो. नर आणि मादी दोघेही नेहमीच जोडीने राहतात.

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

मात्र, जेव्हा मादी पिलांसाठी तीन महिने स्वत:हून ढोलीतल्या घरट्यात होम क्वारंटाईन होते, तेव्हा तब्बल तीन महिने तिच्या आणि पिलांच्या अन्नाची व्यवस्था नर करतो. शहरात मोठाली झाडे असलेल्या भागात सध्या धनेशनी घरटी तयार केली आहेत आणि त्यात धनेश पक्षिणी ‘होम क्वारंटाइन’ झाल्या आहेत. 

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
धनेश पक्षी ग्रामीण भागात, शेतवस्त्या, जंगल आणि शहरी भागातही पहायला मिळतो. उंच झाडावर ढोलीत हा घरटे तयार करत असतो. पक्षीप्रेमी व त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. किशोर पाठक म्हणाले, की हा पक्षी ६१ सेंटीमीटर लांब, शेपटीवर आडवे पट्टे असतात. लांब वाकलेल्या चोचीवर शिंगासारखा वाढलेला भाग असतो जो छोटा आणि टोकदार असतो यामुळे याला शिंगचोचाही म्हणतात. याचे डोळे लाल असतात आणि पापण्यांना केस असतात. नराच्या गडद चोचीवर शिंगासारखा मोठा टोकदार भाग असतो तर मादीला छोटा परंतू तो टोकदार नसतो. 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

धनेशचे प्रमाणही होतेय कमी 

उंच आणी मोठाली खोड असणारी झाडे धनेश पक्षांचे आश्रयस्थान आहे. औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, दिल्ली गेट परिसरातील हिमायतबाग, मजनू हिल परिसरातील सलीमअली सरोवर, छावणी, चिकलठाणा एमआयडीसी तसेच शहरातील अनेक ठिकाणच्या झाडांवर धनेश पक्षी आहेत. मात्र, त्यांच्या आवडीची वड, पिंपळ, उंबराची झाडे तोडली जात असल्याने त्यांची संख्या कमी होत आहे. शहरात २० जोड्या म्हणजे ४० पक्षी असावेत असे डॉ. पाठक यांनी सांगितले. 

 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

 
ढोलीत होते मादी क्वारंटाइन 
 
डॉ. पाठक यांनी सांगीतले, की या पक्षांचा घरटी तयार करण्याचा काळ एप्रिल ते जून आहे. मादी २ ते ५ अंडी देते. अंडी देण्यापुर्वी दोघे मिळून झाडाच्या ढोलीत घरटे तयार करतात. विशेषतः पाम ट्री, नारळ, चिंच, आंबा, वडाच्या ढोलीत घरटे तयार करतात. मादी घरट्यात जाते आणि स्वतःला कोंडून घेते. ती मध्ये जाऊन नराने बाहेरून आणुन दिलेला चिखल आणि स्वतःची विष्ठा याच्या सहाय्याने घरट्याचे तोंड लिंपून बंद करते. फक्त चोच बाहेर निघेल एवढीच फट ठेवत असते. या फटीतुन नर तिला अडीच ते तीन महिने अन्न आणून भरवतो. या काळात मादीची पिसे झडतात आणि अंड्यातुन पिल्ले बाहेर आल्यानंतर पुन्हा पिसे येतात. अंडी घालण्याच्या एक आठवडा आधी ती स्वतःला घरट्यात बंद करून घेते ती पिले जन्मल्यानंतरच बाहेर येते. 

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

नर कोंडून ठेवतो गैरसमज 

नर धनेश मादीला कोंडून ठेवतो असा समज आहे. मात्र, तो पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट करताना डॉ. पाठक म्हणाले, की धनेश हा कुटूंबवत्सल आहे आणि नर मादी दोघेही एकमेकांशी प्रामाणिक राहणारे आहेत. सारस, चक्रवाकसारखे हे जोडीनेच फिरतात. शिकारी पक्षांपासून अंडी व पिलांचे संरक्षण व्हावे, पोपट, घुबड, मैना यांच्याकडून पिलांना त्रास होऊ नये यासाठी मादी स्वतः घरट्यात स्वताला कोंडून घेत असते. या काळात धनेश त्यांची काळजी घेत असल्याने त्याची धावपळ वाढते आणि तो प्रकृतीने बारीक होत असल्याचे डॉ. पाठक यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad this bird was Home Quarantine