बायकोच्या अनैतिक संबधाला त्रासून पती व मुलीने घेतले विष

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

तू माझ्या संसाराचा नास केला. आता आम्ही तूझ्यामुळे मरत आहे. आता तू एकटीच आहेस. तू आता मोकळी आहे असे उपचारादरम्यान अमेय पत्नीला उद्देशुन म्हणत होता. 

 औरंगाबाद - तू माझ्या संसाराचा नास केला. आम्ही तूझ्यामुळे मरतोय. आता तू एकटीच आहेस, त्यालाचा सांभाळ असे पत्नीला म्हणुन पती व चौदा वर्षीय मुलीने उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार औरंगाबादेतील गारखेडा भागात मंगळवारी (ता. 24) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मुळ विर्दभातील पण औरंगाबादेत राहणाऱ्या अमेय व रोहीणी राहतात. (दोन्ही नावे बदलली आहेत.) त्यांना एक मुलगा व एक मुलगी नयना (नाव बदलले) आहेत. नयना नववीत शिक्षण घेते. सेंट्रीग काम करुन अमेय कुटुंबाची उपजिविका भागवतो. अमेयची पत्नी रोहीणीने काही माहिण्यांपुर्वीच खाजगी कंपनीतील नोकरी सोडली होती. कष्ट करुन अमेय घराची पुर्ण जबाबदारी संभाळीत आहे. ते राहत असलेल्या गल्लीतच एका किराणा दूकानदाराशी रोहीणी सतत फोनवर बोलत होती.

 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे
 

त्यातुन अमेय व दोघात वाद सुरु होते. पत्नीशी लगट न करण्याबाबत समजावण्यासाठी अमेय दूकानदाराकडे गेला. त्यावेळी दूकानदार व त्याच्या पत्नीने अमेयला मारहाण केली. यानंतर अमेय व्यथीत झाला. त्याची पत्नी रोहीणीनेही अमेय त्रास देतो असे सांगून भावाकडून त्याला व त्याच्या आईला मारहाण करायला लावली. त्यानंतर अमेयची आई घरी परतली नाही. रोहीणीचे नातेवाईक शहरातच असल्याने ती अमेयला मारण्यासाठी बोलवित होती.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...
 

अमेयला नातेवाईक नसल्याने तो हे निमुटपणे सहन करु लागला. यातून त्यांचे 24 डिसेंबरला जोरदार भांडण झाले. वाद झाल्यानंतर मुलगी नयनासोबत ते शहरातील पुंडलिकनगर पोलिस ठाण्याकडे निघाले. त्रस्त अमेयकडे ऊंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या होत्या. पोलिस ठाण्याकडे भांडत येतानाच अचानक अमेय व त्याची मुलगी नयना हिने विषारी गोळ्या खाल्ल्या.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

या घटनेची माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक घनशाम सोनवणे, त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गोर्डे, सुरेश शिंदे यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत मुलगी नयना व वडील अमेय अत्यवस्थ झाले. त्यांना लगेचच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

या अवस्थेत अमेय म्हणाला.. 
तू माझ्या संसाराचा नास केला. आता आम्ही तूझ्यामुळे मरत आहे. आता तू एकटीच आहेस. तू आता मोकळी आहे असे उपचारादरम्यान अमेय पत्नीला उद्देशुन म्हणत होता. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

तिच्या डोळ्यात थेंबही नव्हता... 
घाटी रुग्णालयात उपचारासाठी अमेय व नयनाला दाखल करताना एका वाहनातून नेले जात होते. त्यावेळी मुलगी बेशुद्ध होती. अशा स्थितीतही तसेच रुग्णालयातही उपचार सुरु असताना तिचीच आई रोहीणीच्या डोळ्यात मात्र थेंबही दिसुन आला नाही. अशी माहिती श्रीमंत गोर्डे पाटील यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Breaking Husband, Daughter Suside Attempt