esakal | कर्जबाजारीपणाला कंटाळून दाम्पत्याची नदीत उडी; महिलेला वाचवण्यात यश, पुरुष बेपत्ताच
sakal

बोलून बातमी शोधा

river

कर्जबाजारीपणा आणि जीवनात आलेल्या नैराश्याला वैतागून औरंगाबादच्या एका पती पत्नी दांपत्यानी आत्महत्येचा प्रयत्न केला

कर्जबाजारीपणाला कंटाळून दाम्पत्याची नदीत उडी; महिलेला वाचवण्यात यश, पुरुष बेपत्ताच

sakal_logo
By
जमिल पठाण

कायगाव (औरंगाबाद): कर्जबाजारीपणा आणि जीवनात आलेल्या नैराश्याला वैतागून औरंगाबादच्या एका पती पत्नी दांपत्यानी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. औरंगाबाद- पुणे महामार्गावरील जूने कायगाव (ता.गंगापूर) येथील गोदावरी नदीच्या पाण्यात उडी घेतल्याची घटना बुधवारी (ता.20) रात्री साडे आठच्या दरम्यान घडली. स्थानिक जीवरक्षक दलाच्या युवकांनी प्रसंगावधान राखून जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन महिलेस सुखरूप पाण्यातून वाचवले आहे.

मात्र शर्तीचे प्रयत्न करून देखील अद्याप पर्यंत महिलेच्या पतीचा शोध लागला नाही. या बाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औरंगाबाद पुणे महामार्गावरील गोदावरी नदीच्या नवीन पुलाखाली एक  30 वर्षीय महिला वाचवा वाचवा असे किंकळत मोठं मोठ्याने ओरडत होती. तिच्या मदतीसाठी ओरडणेचे आवाज पुलावरील अनोळखी व्यक्तीने ऐकले. त्याने लगेच कायगाव येथील स्थानिक जीवरक्षक दलाचे बाळू चित्ते यांना संपर्क साधून कळविले.

गटविकास अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू

बाळू चित्ते व त्यांचे सहकारी  यांनी मदतीसाठी धाव घेतली. नदीच्या पाण्यातील पाईपला महिला धरून बसली होती. माझ्या नवऱ्याला वाचवा असे वारंवार ओरडून म्हणत होती. जीवरक्षक दलाने दीड तास पाण्यात बुड्या मारून सर्वत्र शोध घेतले असता मात्र त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. जीवरक्षक दलाच्या युवकांनी पोलिसांना घटनास्थळी बोलविले.

लगेच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोलिस नाईक सोमनाथ मुरकुटे आदी पोहचले. त्यांनी त्या महिलेची विनंती करून मन परिवर्तन करून जीवरक्षक दलाच्या युवकांच्या मदतीने त्या महिलेस पाण्यातून वाचवून काढले. दुर्दैवी घटनेने प्रचंड घाबरलेली रात्रीच्या वेळी अधिक बोलण्याचा मनस्थितीत नव्हती. पोलिसांनी आधार कार्डच्या पत्त्यावर त्या महिलेच्या भावास बोलवून त्याच्या सोबत तिला घरी पाठवले.

Crime news: खंडपीठातील लिपिकाचा E-mail हॅक करून पैशांची मागणी; पत्नीवर संशय | eSakal

पाण्यात बुडालेल्या त्या व्यक्तीचे आधार कार्ड वरून नाव भागवत वैशिष्ट सावंत (वय 33 ) राहणार पाटोदा ता.जिल्हा औरंगाबाद असे असल्याचे कळले. गुरुवारी (ता.21) सकाळी  घटनास्थळी शोधाशोध केली असता त्या पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही. पुढील तपास पोलिस हेडकान्स्टेबल विजय भिल्ल करत आहे.

(edited by- pramod sarawale)