esakal | Crime news: खंडपीठातील लिपिकाचा E-mail हॅक करून पैशांची मागणी; पत्नीवर संशय
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad crime news

या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Crime news: खंडपीठातील लिपिकाचा E-mail हॅक करून पैशांची मागणी; पत्नीवर संशय

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: एका न्यायालयीन लिपिकाचे ईमेल अकाउंट हॅक करून लिपिकाच्या मित्रांना पैशांची मागणी करणारे ईमेल पाठवून फसवणूक केल्याची प्रकार ऑगस्ट २०१९ मध्ये घडला. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता हा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

लिपिकाने यासंदर्भात पुंडलिकनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, १ ऑगस्ट २०१९ ला त्यांच्या ईमेलआयडीचा पासवर्ड बदलल्याचे नोटीफिकेशन आले. त्यामुळे यांनी आपल्या दुसऱ्‍या ईमेल आयडीवरून पासवर्ड रिसेट करण्यासाठी रिक्‍वेस्ट पाठवून पासवर्ड बदलला. मात्र, हॅकरने दोन्ही ईमेलची रिकव्हरी करण्यासाठी स्वत:चा ईमेल आणि मोबाइल क्रमांक टाकून दोन्ही ईमेलचे पासवर्ड बदलले.

Gram Panchayat Election: सोयगाव तालुक्यात सरपंचपदाची सोडत कधी सुटणार ? | eSakal

त्याचवेळी लिपिकाने ईमेलमध्ये हॅकरचे रिकव्हरी ईमेल व मोबाइल क्रमांक बदलण्याआधी स्क्रीन शॉट काढून घेतला. त्यानुसार लिपिकाने हॅक झालेल्या एका ईमेलचा पासवर्ड बदलला. मात्र, दुसऱ्‍या ईमेलचा पासवर्ड बदलू शकले नाही. ईमेल अकाउंट हॅक करून लिपिकाने त्यांच्या मित्रांना मेलद्वारे पैशांची मागणी करण्यामागे लातुरात राहणाऱ्या पत्नीसह तसेच तिच्या मामेभाऊ, मित्रांचा हात असल्याचा संशय लिपिकाने व्यक्‍त केला आहे. 

मित्राने सांगितल्यानंतर आले समोर- 
ऑगस्ट २०१९ मध्ये लिपिकाच्या एका मित्राने त्यांची भेट घेतली आणि ‘तुझ्या ईमेलवरून पैशाची मागणी करणारा एक मेल आला असून त्यात, तू अडचणीत आहे’ असा आशयाचा मजकूर असल्याचे सांगितले. तेव्हा हॅकर मेलवरून ओळखीच्या लोकांकडून पैसे मागत असल्याचे फिर्यादी लिपिकाच्या लक्षात आले.

Breaking: मराठा आरक्षणासाठी तरूणाने घेतले विष, तत्पूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे मांडले प्रश्न |

लिपिकाने ३ ऑगस्ट २०१९ ला सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा सायबर क्राइमकडे वर्ग करण्यात आला.

(edited by- pramod sarawale)