esakal | गटविकास अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay shinde

आता औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले गटविकास अधिकारी लोंढेमुळे दुसऱ्या ग्रामविकास अधिकारी बिडकीन ग्रामपंचायत मध्ये असलेले संजय हरिभाऊ शिंदे यांनी आत्महत्या केली आहे.

गटविकास अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By
गणेश सोनवणे

बिडकीन (औरंगाबाद): बिडकीन ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी संजय हरिभाऊ शिंदे यांनी पैठणच्या पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी लोंढे यांच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी (19) रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले होते. त्यातच आज (ता. 21) गुरुवार रोजी औरंगाबाद येथील सिटीकेअर रुग्णालयात उपचारादरम्यानसकाळी दहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

पैठण तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना दरमहा पैशांची मागणी करीत असलेले पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. डी. लोंढे हे ग्रामसेवकांना दरमहा मिळत असलेल्या पगारातून व वित्त आयोगातील काढण्यात आलेल्या धनादेशातून पैशांची मागणी करतात. तसेच पैशांची मागणी पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवक कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत मधून अभिलेख स्वतः लोंढे जमा करून घेतात व ग्रामसेवकाना पैशांची मागणी करून मानसिक त्रास देतात, असा आरोप त्यांच्यावर ग्रामसेवक युनियनच्या सदस्यांनी केला आहे.

Crime news: खंडपीठातील लिपिकाचा E-mail हॅक करून पैशांची मागणी; पत्नीवर संशय | eSakal

सर्व ग्रामसेवक युनियनच्या सदस्यांनी निवेदनातलेखी दिले आहे. सदर गटविकास अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास( ता.२१)  जानेवारी गुरूवारपासून ग्रामसेवकाचे संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंद केले जाईल, असं युनियनने सांगितलं आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गटविकास अधिकारी लोंढे यांची सीआयडीमार्फत चौकशीही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सर्व सदस्यांनी केली आहे.

यापूर्वीसुद्धा सदर गटविकास अधिकारी लोंढे हे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना अनेक ग्रामसेवकांना त्रास दिलेला असून तिथेही ग्रामसेवक बुद्धदेव म्हस्के यांनी लोंढे यांच्या अशाच त्रासामुळे आत्महत्या केली त्याचीही चौकशी सध्या सुरू आहे.

Gram Panchayat Election: सोयगाव तालुक्यात सरपंचपदाची सोडत कधी सुटणार ? | eSakal

आता औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले गटविकास अधिकारी लोंढेमुळे दुसऱ्या ग्रामविकास अधिकारी बिडकीन ग्रामपंचायत मध्ये असलेले संजय हरिभाऊ शिंदे यांनी आत्महत्या केली आहे.

go to top