कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड तालुक्यात मंगळवारी (ता.२३) तब्बल 94 बधितांची भर पडली, तर उपचार घेणाऱ्यांची संख्या 371 वर पोहोचली आहे. बधितांची संख्या दररोज वाढत आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. हतनूर शेजारील टापरगाव येथे तब्बल 17, तर बोरसर सारख्या छोट्या गावात 8 बाधित आढळल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कन्नड शहरातील 38 आणि ग्रामीण भागातील 56 असे एकूण 94 बाधित आढळले आहेत.
ग्रामीण रुग्णालयात 36, शिवाजी महाविद्यालय येथील मुलींचे वसतीगृहात 34 ,औरंगाबाद येथे 19, घरगुती विलगीकरण 241, चिखलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 8, तर 28 रुग्ण इतर ठिकाणी उपचार घेत आहेत. तालुक्यात आतापर्यंत 1967 रुग्ण बाधित आढळलेले आहेत. त्यातील 1533 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत तालुक्यात कोरोनामुळे 63 रुग्णांना जीव गमवावा लागलेला आहे.
संपादन - गणेश पिटेकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.