Aurangabad lockdown
Aurangabad lockdown

Aurangabad Lockdown: रात्रीची संचारबंदी आता १५ एप्रिलपर्यंत; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई

औरंगाबाद: सध्याची कोविडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेन अगेनमधील तरतुदी १५ एप्रिलपर्यंत लागू केल्या आहेत. त्यानुसार रात्रीची संचारबंदी १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

शासनाच्‍या मिशन बिगेन अगेनच्‍या मार्गदर्शक सूचनांची जिल्‍हयात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी सुनील चव्हाण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गुरूवारी ( ता. एक ) बैठक झाली. पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, नोडल अधिकारी श्रीमंत हारकर आदी उपस्थित हेाते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, कोविड-१९ काळात नियमांचे पालन न करणा-या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी वॉर्डनिहाय तसेच ग्रामीण भागात बाजाराची गावे शोधून तिथे पथक नेमण्‍यात यावे. महापालिका क्षेत्रात गर्दीच्‍या तसेच संवेदनशील वॉर्डमध्‍ये आवश्‍यकतेप्रमाणे चार पर्यवेक्षकांचे पथक असावे ज्यामध्ये एक कर्मचारी महापालिकेचा असावा. प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही दोन पथके तयार करावीत. प्रत्येक पथकांमार्फत कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणा-या दैनंदिन किमान १०० वाहनांवर कारवाई करावी. 

ऑटोरिक्षामध्‍ये प्रत्‍येकी दोनच प्रवासी असावेत, महामंडळाच्‍या बसेस, खासगी टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍या या सर्वांना ५० टक्‍के प्रवासी बसवणे याबाबत सुचना देण्‍यात याव्‍यात. राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने आपल्‍या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची ५ पथके तयार करावीत. प्रत्येक पथकांनी शहरातील राज्‍य उत्‍पादन शुल्‍कच्‍या अखत्‍यारीतील दुकाने रात्री वेळेत बंद होण्‍याच्‍या अनुषंगाने व कोविड प्रतिबंधित नियमांचे पालन करयासंबंधीत कारवाई करावी तसचे नियमांचे पालन न करणा-या दैनंदिन किमान १० आस्‍थापनांवर कार्यवाही करण्‍यात यावी. अन्न व औषध प्रशासनाने शहरातील सर्व हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट्स रात्री आठनंतर फक्‍त Take Away पद्धतीने चालू राहतील. तसेच इतर वेळी हॉटेल आसनक्षमतेच्‍या फक्‍त ५० टक्‍के क्षमतेने चालू राहतील याबाबत लक्ष ठेवावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com