औरंगाबादेत सतरा वर्षीय मुलगा पॉझीटीव्ह, संख्या पंचवीसवर

File Photo
File Photo

एकाच दिवशी दोन धक्के, आई दाखल, वडिलांना सुटी 

औरंगाबाद - औरंगाबादेत सोमवारी (ता. १३) तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी (ता. १४) सकाळी ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर सायंकाळी बायजीपुरा येथील १७ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रदीप कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आली.

या पॉझिटीव्ह प्रकरणामुळे एकाच दिवशी औरंगाबादकरांना दोन धक्के बसले आहेत. औरंगाबादेत कोरोना बाधीतांची सख्या आता पंचवीस गेली असून त्यातील दोन रुग्णांचे मृत्यू झाले असून एक रुग्ण बरी होऊन घरी गेली आहे.

बायजीपुरा येथील १७ वर्षीय मुलाला कोरोना (कोवीड -19) च्या संशयावरून जिल्हा रुग्णालयांमध्ये सोमवारी दाखल करण्यात आले होते. त्याच्या सॅबचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ते नमुने मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

१७ वर्षीय मुलगा त्याची आई वडील मुंबईमध्ये होते. ते दहा एप्रिलला औरंगाबादेत आले. यानंतर ते जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आले होते. डॉक्टरांनी तिघांचेही तपासणी करुन सॅबचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी या १७ वर्षीय मुलाचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील कोवीड-१९ वार्डात उपचार करण्यात येत आहेत. 

वडीलाला सुटी 
कोरोनाची बाधा झालेल्या मुलाच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे; तर आईवर मात्र रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com