esakal | औरंगाबाद जिल्ह्यातील कौंदरमध्ये चोरट्यांनी फोडली तीन घरे, लाखो रुपयांचा ऐवज चोरला
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

अनिल राऊत यांच्या घरातील २० हजार रूपये रोख तसेच ५० साड्या, ३० शर्टपीस लंपास केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील कौंदरमध्ये चोरट्यांनी फोडली तीन घरे, लाखो रुपयांचा ऐवज चोरला

sakal_logo
By
दिगंबर सोनवणे

दावरवाडी (जि.औरंगाबाद) : कौंदर (ता.पैठण) येथे रविवारी  (ता.सात) सकाळी चोरट्यांनी तीन घरे फोडून लाखो रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील रावसाहेब ठाणगे यांच्या घराशेजारील सर्व घरांना चोरट्यांनी बाहेरून कड्या लावून रावसाहेब ठाणगे यांच्या घरातील एक लाख १५ हजार रोख रक्कम तसेच आठ ग्रॅम सोने, दोन ग्रॅम चांदी अशा ऐवज लंपास केला.

अनिल राऊत यांच्या घरातील २० हजार रूपये रोख तसेच ५० साड्या, ३० शर्टपीस लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी भागवत खिरे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला. त्यांच्या घरातील ११ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले. या विषयी पोलिस पाटील रामेश्वर सोनवणे यांनी पाचोड पोलिस स्टेशनला माहिती देताच बिट जमादार किशोर शिंदे, पोलिस काॅन्स्टेबल फिरोज बरडे यांनी घटनास्थळी दाखल घटनेचा पंचनामा केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी केलेल्या सर्व ठिकाणी शेजारील घराच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन - गणेश पिटेकर