Aurangabad Breaking : आज 15 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 297 वर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

औरंगाबादेत शनिवारी कोरोनाबाधितांची संख्या २५६ होती. त्यात रविवारी २६ रुग्णांची भर पडली. सोमवारी सकाळच्या सत्रात नऊ रुग्णांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आला. यात किलेअर्क, देवळाई, पुंडलिकनगर, नंदनवन कॉलनी, चिखलठाणा येथील रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळच्या सत्रात संजयनगर, मुकुंदवाडी चार , किलेअर्क - एक, हडको एन -11 येथील एकूण सहा रुण्ग पॉझिटिव्ह आहेत. 

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून सोमवारी (ता. चार मे ) सकाळी नऊ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर सायंकाळी आणखी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता बाधितांची संख्या २९७ झाली असून १० जणांचा मृत्यू झाला आहे.
 
औरंगाबादेत शनिवारी कोरोनाबाधितांची संख्या २५६ होती. त्यात रविवारी २६ रुग्णांची भर पडली. सोमवारी सकाळच्या सत्रात नऊ रुग्णांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आला. यात किलेअर्क, देवळाई, पुंडलिकनगर, नंदनवन कॉलनी, चिखलठाणा येथील रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळच्या सत्रात संजयनगर, मुकुंदवाडी चार , किलेअर्क - एक, हडको एन -11 येथील एकूण सहा रुण्ग पॉझिटिव्ह आहेत. 

हेही वाचा - Breaking : औरंगाबादमध्ये कोरोनाचा दहावा बळी, रुग्ण संख्या २८३ वर

बायजीपुरा येथील १५ वर्षीय रुग्णाला सुटी 
शहरातील बायजीपुरा येथील १५ वर्षीय रुग्णाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रविवारी सुटी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत  २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्हा रुग्णालयात आता ९० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तेथे आज आठ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. ४१ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

कोरोना मीटर 

  • उपचार घेत असलेले रुग्ण : २६२
  • बरे झालेले रुग्ण : २५
  • मृत्यू झालेले रुग्ण : १०
  • एकूण  :  २९७

रविवारी दिवसभरातील अपडेट्स 

  • ‘घाटी’त २५ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण 
  • रविवारी दुपारी चारपर्यंत घाटी रुग्णालयात ६९ रुग्ण भरती.  
  • ‘घाटी’च्या कोविड डेडिकेटेड रुग्णालयात २५ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू. 
  • त्यापैकी २१ रुग्णांची स्थिती सामान्य. चार रुग्णांची स्थिती गंभीर. 
  • ‘घाटी’त ३२ कोविड निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू, एकूण २१ कोविड निगेटिव्ह बरे झाल्याने त्यांना सुटी. 
  • ७२ जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा व घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Breaking Today 15 positive, 297 patients