esakal | Happy New Year: नववर्षाचा संयमी जल्लोष; हॉटेल-बारमध्ये अकरानंतर शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

Citizens in Aurangabad district have celebrated the celebration of Thirty First at home with restraint due to night curfew 22.jpg

यंदा नाईट कर्फ्युमुळे रस्त्यावरही शुकशुकाट दिसून आला. बार, रेस्टॉरंटवर डिजे लावून थिरकणारेही यंदा तुरळक ठिकाणी दिसून आले. 

Happy New Year: नववर्षाचा संयमी जल्लोष; हॉटेल-बारमध्ये अकरानंतर शुकशुकाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद  : दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या जल्लोषावर यंदा कोरोनाचा प्रभाव दिसून आला. शहर व जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू असल्याने, गुरुवारी (ता.३१) थर्टी फर्स्टचे सेलीब्रेशन हॉटेल, बार, रेस्टॉरंटऐवजी नागरिकांनी संयमाने घरीच केले.
 
औरंगाबादच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी दरवर्षी मोठी जय्यत तयारी केली जाते. हॉटेल, रेस्टॉरंट व दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईचा लखलखाट केला जातो. तरुणाईचा बेभान जल्लोष पहाटेपर्यंत रंगतो. मात्र यंदा शहर, जिल्ह्यात २२ डिसेंबरपासून ३१ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या नाईट कर्फ्युमुळे हॉटेल, बार रेस्टॉरंट हे रात्री साडेदहा वाजता बंद करावे लागले. यामुळे अनेकांनी मटन-चिकनचे पार्सल आणत घरीच बेत आखला. दरवर्षी रात्री अकरापासून जल्लोष सुरु होतो. यंदा नाईट कर्फ्युमुळे रस्त्यावरही शुकशुकाट दिसून आला. बार, रेस्टॉरंटवर डिजे लावून थिरकणारेही यंदा तुरळक ठिकाणी दिसून आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हॉटेलचालकांचा व्यवसाय वाढला 

रात्रीच्या संचारबंदीमुळे आठवड्यापासून हॉटेल, बार, रेस्टॉरंट रात्री साडेदहा वाजताच बंद करावे लागत आहेत. यामुळे केवळ ३० टक्केच व्यवसाय झाला. मात्र, थर्टी फर्स्टला हा व्यवसाय ८० टक्क्यांवर गेला. सर्व हॉटेल, बार फुल्ल होते, अशी माहिती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मनगटे यांनी दिली. 

मद्य विक्रेत्यांची चांदी 

बिअर, वाईन शॉपी, देशी दारू दुकानांवर खरेदीसाठी मोठी पाय ठेवायलाही जागा नव्हती. अनेकांनी पार्सल नेले पसंत केले. यामुळे मद्य विक्री करणाऱ्यांनी बक्कळ कमाई केली. नियमीत होणाऱ्या व्यवसायापेक्षा आज चार पट व्यवसाय झाला.