Corona Breaking : औरंगाबादेत चोवीस तासात कोरोनामुळे १३ जणांचा बळी

प्रकाश बनकर
Saturday, 8 August 2020

मृत्यु दरात पुन्हा होतेय वाढ
- तासात घाटीत सात तर खाजगीत सहा जणांचा मृत्यू 

औरंगाबाद : औरंगाबाद : कोरोनाचा कहर जिल्ह्यात सुरूच आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात घाटीत सात तर खाजगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचा एकूण आकडा ५३५ वर गेला आहे. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

गेल्या महिन्यात नऊ दिवसाचा करण्यात आलेला लॉकडाऊन व अँटीजेन टेस्टमुळे मृत्यू दर कमी झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून मृत्यूच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

मृत्यूत यांचा समावेश 

१) छावणी येथील ७३ वर्षीय महिलेस २८ जुलै रोजी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याच दिवशी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला व ७ ऑगस्ट रोजी उपचारा दरम्यान दुपारी दीड वाजता त्यांचा मृत्यू झाला.

२) रांजणगाव शेणपुंजी येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णात सहा ऑगस्ट रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.

३)लालमन कॉलनी पदमपूरा येथील ७१वर्षीय पुरुष रुग्णास पाच ऑगस्ट रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले .शुक्रवारी  त्यांचा रात्री साडेनऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

४) रांजणगाव शेणपुंजी येथील ७२ वर्षीय रूग्णास २९ जुलै रोजी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले व आज १२: ४० मिनिटात यांचा मृत्यू झाला.

५) सावखेडा (गंगापूर) येथील ७० वर्षीय महिलेस ४ ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज त्यांचा सकाळी १०:२५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

६)बिल्डा(फुलंब्री) येथील एकाहत्तर वर्षीय रुग्णास २० जुलै रोजी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

७) लोणी खुर्द(वैजापूर) येथील ७८ वर्षीय रुग्णास आज घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

८)नंदनवन कॉलनी खासगी रुग्णालयांमध्ये नंदनवन कॉलनीतील ५४ वर्षीय स्त्रीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

९) खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा येथील ४९ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

१० )गंगापूर तालुक्यातील अंबेगावातील ८५ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

११ )गंगापुरातील ८२ वर्षीय पुरूष कोरोनबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

संपादन-प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad corona last 24 hours 11 corona death