३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह ; संशयितांची संख्याही घटली

शेखलाल शेख
गुरुवार, 26 मार्च 2020

दोन दिवसांपुर्वीच कोरोनाग्रस्त महिला कोरोनामुक्त झाल्याने औरंगाबादकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यापाठोपाठ आता औरंगाबादेतून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविलेल्या ३२ जणांचे स्वॅबचे नमुनेही निगेटिव्ह आले.

औरंगाबाद : खाजगी रुग्णालयात ५९ वर्षीय प्राध्यापक महिलेवर यशस्वी उपचार केल्यानंतर गुरुवार (ता.२६) औरंगाबादसाठी सुखद ठरला. पाठविलेल्या स्वॅब (लाळे) नमुन्यांपैकी ३२ जणांचे अहवाल नेगिटिव्ह आले. याशिवाय मिनी घाटीत दाखल होणाऱ्या संशयितांची संख्याही घटली. गुरूवारी केवळ पाचच संशयित दाखल झाले. प्रशासनामार्फत राबवित असलेल्या उपाययोजनांचा हा इफेक्ट म्हणावा लागेल. मात्र तरीही नागरिकांनी आणखी काही दिवस खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगीतले.

हेही वाचा : गुढीऐवजी उभारा भगवी पताका

दोन दिवसांपुर्वीच कोरोनाग्रस्त महिला कोरोनामुक्त झाल्याने औरंगाबादकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यापाठोपाठ आता औरंगाबादेतून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविलेल्या ३२ जणांचे स्वॅबचे नमुनेही निगेटिव्ह आले. तर गुरूवारी संशयितांचा आकडाही कमी झाला. अवघे पाच संशयित आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल झाले.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..

औरंगाबादेत आत्तापर्यंत ८६० लोकांची तपासणी
औरंगाबादेत आतापर्यंत ८६० लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३६९ लोकांना होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत पुणे येथील प्रयोगशाळेत ८७ संशयितांचे लाळेचे नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी ७८ रुग्णांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona suspected negative