औरंगाबादेत कोरोना मीटर वेगात, दिवसभरात ११४ पॉझिटिव्ह!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

आजपर्यंत एकूण १,१२० जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ५८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद :  गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या शंभराच्या आत असताना मंगळवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांची वाढली आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना मीटरचा वेग वाढला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात आज मंगळवार (ता.१७) ८७ जणांना (मनपा ६४, ग्रामीण २३) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ४०,०७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दिवसभरात एकूण ११४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१,७७६ झाली आहे.

आजपर्यंत एकूण १,१२० जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ५८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मनपा हद्दीत आठळून आलेले रुग्ण (९५)
एन ७ सिडको (१), अयोध्या नगर  (१), नगरी विहार परिसर  (१), पैठण रोड परिसर  (२), पगारिया कॉलनी, पैठण रोड  परिसर  (१), श्रेय नगर (१), जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर (१), उस्मानपुरा (१), पद्मपुरा (१), राम नगर (१), विद्या नगर (१), सुंदरवाडी (१), रोकडिया हनुमान कॉलनी (१), टीव्ही सेंटर, हडको (१), हर्सुल परिसर (१), कांचनवाडी (३), अन्य (७६)

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामीण भागातील रुग्ण (१९) 
पैठण  (१), खर्ज वैजापूर (१), अन्य (१७) 

एक कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत सिल्लेगाव लासूर येथील ६० वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad corona update today 114 new corona positive