Corona Update : औरंगाबादेत आज ९६ पॉझिटिव्ह; चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

मनोज साखरे
Friday, 7 August 2020

खासगी रुग्णालयात शहरातील अल्ताफ कॉलनीतील ४६ वर्षीय पुरूष, सिडकोतील ६२ वर्षीय स्त्री, बजाज नगरातील ५७ वर्षीय स्त्री आणि वाळूज परिसरातील मनिषा कॉलनीतील २८ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. ७)  ९६ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७० एवढी झाली आहे. तसेच चार कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण बधितांपैकी ११ हजार ६७६ बरे झाले असून ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६८१ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

शहरातील बाधीत रुग्ण 
समृद्धी नगर एन चार सिडको (३), भानुदास नगर (२), नारेगाव (१), मधुरा नगर (१), मयूर नगर (१), मोची गल्ली (२), क्रांती नगर (१), रोकडा हनुमान कॉलनी (२), जालान नगर, बन्सीलाल नगर (१), शिवाजी नगर, सूतगिरणी रोड (२), न्यू गणेश नगर,  अहिल्या नगर चौक  (१),  एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको (१),  सैनिक नगर, पडेगाव रोड (१), नक्षत्रवाडी (१), शिवाजी नगर (१),  देशमुख नगर, गारखेडा (१), मोचीवाडा, पद्मपुरा (१),  एकनाथ नगर (१),  उस्मानपुरा (१),  कर्णपुरा (१),  होनाजी नगर, जटवाडा रोड (१), श्रीकृष्ण नगर, शहानूरवाडी (१),  जय भवानी नगर (५), बालाजी नगर (२), मिल कॉर्नर (१),  उल्कानगरी, गारखेडा (१),  विद्यानिकेतन कॉलनी (१), एन सात, अयोध्या नगर (७), ब्रिजवाडी (३), माणिक नगर, नारेगाव (३), एन दोन, जे सेक्टर (२), गोलवाडी (१), राजाबाजार, बालाजी मंदिर परिसर (२), सौजन्य नगर (१), स्वराज नगर (१), शिवशंकर कॉलनी (१), बुद्ध नगर (४), घाटी परिसर (१), अनय् (६), भावसिंगपुरा (२), छावणी परिसर (१), गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा (१)   

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश
ग्रामीण भागातील बाधीत रुग्ण 

खुलताबाद (१), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (१),  वडगाव कोल्हाटी, बजाज नगर (१),  पोलिस स्टेशन परिसर, वाळूज (२), ओमसाई नगर, जोगेश्वरी (२),  लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव (१),  फुलंब्री भाजी मंडई  परिसर (२), स्नेह नगर,सिल्लोड (१), सिल्लोड उपविभागीय रुग्णालय  परिसर (१),  शिवाजी नगर,सिल्लोड (१), टिळक नगर,सिल्लोड (२), भराडी,सिल्लोड (२), बोरगाव बाजार, सिल्लोड (१), करमाड (४)

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  
चार कोरोनाबाधितांचा बळी

खासगी रुग्णालयात शहरातील अल्ताफ कॉलनीतील ४६ वर्षीय पुरूष, सिडकोतील ६२ वर्षीय स्त्री, बजाज नगरातील ५७ वर्षीय स्त्री आणि वाळूज परिसरातील मनिषा कॉलनीतील २८ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Edit By Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update today 96 positive and four Death