esakal | वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश
sakal

बोलून बातमी शोधा

neha kirdak.jpg

नेहा किर्दकची युपीएससीत ३८३ वी रॅंक, आई वडिलांची दोन्ही स्वप्ने पुर्ण 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : आईचे स्वप्न होते मी एमबीबीएस करावे तर, वडिलांचे स्वप्न मला आयएएस करण्याचे होते. दोघांचेही स्वप्न पुर्ण केल्याने मी आनंदी आहे. माझ्यासाठी त्यांना तडजोडीही कराव्या लागल्या. माझ्यासाठी वडिलांनी त्यांचे करिअर थांबवले तर आईने आर्थिक बाजू सांभाळली. सोबतच माझा लहान भाऊ यश यानेही तो दहावीत असताना खुप मदत केलीय.’’ अशी प्रतिक्रिया यूपीएससी निकालात २२व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ३८३वी रॅंक मिळवलेल्या नेहा किर्दक हिने ‘सकाळ’ला दिली.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

नेहाने एमबीबीएसचे शिक्षण घेत असतानाच शेवटच्या वर्षात युपीएससीचा अभ्यास सुरु केला. ‘‘एमबीबीएस दरम्यान, जालन्याचे आयएएस अन्सार शेख हे नातेवाईकांनी दाखवण्यासाठी घाटीत आले. त्यावेळी आपणही असेच अधिकारी असे वाटल्याने युपीएससीची जोराची तयारी केली. यासाठी पुणे, मुंबईला न जाता औरंगाबादेतुनच तयारी करण्याचे ठरवले. वर्षभर एका क्लासेसमध्ये फाऊंडेशन कोर्स केला. पण, त्यानंतर वर्षभर दिल्लीतील ‘व्हिजन आयएएस’ हे ऑनलाईन कोचिंग सेंटर जॉईन केले. क्लासेस आणि टेस्ट सिरीजचा लाभ झाला. रोजची दैनिकेही उपयुक्त ठरली. त्यासोबतच मुलाखतीवेळी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये सनदी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.’’ असे नेहा सांगते. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

वडिलांनी थांबवले करिअर 
नेहा किर्दकचे वडील लक्ष्मण किर्दक हे मुळचे आडस (ता. केज, जि. बीड) या गावचे आहेत. औरंगाबादेत १९९२ ला येत त्यांनी क्लासेस सुरु केले. मुलगी एमबीबीएसचे शिक्षण घेत होती तर, तिला कॉलेजला येण्या-जाण्यासाठी वडिलांनी त्यांचे २२ वर्षांचे करिअर थांबवले. सर्वतोपरी मदत करताना मुलीला बसल्या जागी चहा देण्यापर्यंतची भुमिका वडिलांनी निभावली. ‘‘चार वर्षे ते केवळ माझ्याच मागे होते. कॉलेजला सोडण्यापासून परीक्षेसाठी दिल्लीत थांबण्यापर्यंत ते सोबतच असल्याचे नेहाने सांगितले. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  
असे झाले नेहाचे शिक्षण 
औरंगाबादेतील शारदा मंदीर शाळेतून सेमी इंग्रजी माध्यमातुन ९६ टक्के गुणांसह दहावीचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर २०१५ मध्ये देवगिरी महाविद्यालयातुन तेवढेच गुण मिळवत बारावीचे शिक्षण घेतले. मेडिकलच्या प्रवेश परिक्षेत ९० वी रॅंक घेत घाटीला एमबीबीएस पुर्ण केले. मुलीच्या यशाबद्दल अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया वडील लक्ष्मण किर्दक यांनी दिली. तर आई आशा किर्दक यांनी तिने महिलांसाठी काहीतरी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

यश आला धावुन 
नेहासाठी आई-वडिलांसोबत लहान भाऊ यश देखील धावुन आला. तो दहावीत असताना प्रश्‍नपत्रिका प्रिंट काढायच्या. लिहुन झाल्यानंतर उत्तरपत्रिकांचे फोटो काढुन ते पीडीएफ करायचे. त्यानंतर ऑनलाईन क्लासेसला पाठवायचे. तिकडुन तपासून आल्यानंतर पुन्हा किती गुण मिळवले, हे सांगण्याचे काम तोच करायचा. महिन्याला पाच ते सात वेळेस अशी कसरत त्याला तासभर करावी लागली. त्यातूनही त्याने दहावीला ९८ टक्के गुण घेतले. हे विशेष. 


मोठे अधिकारी व्हावे, हे लहानपणापासूनचे स्वप्न होते. आईने आर्थिक बाजु सांभाळली. माझ्यासाठी वडिलांनी त्यांचे करिअर थांबवल्यानंतर उपजीविकेचे साधन आईच आहे. दोनच मैत्रिणी आहेत. मी सोशल मीडियावर नाही. त्यासाठी आई-वडिलांचाच मोबाईल वापरत असल्याचे नेहा म्हणाली. 
नेहा किर्दक 

Edited By Pratap Awachar

go to top