कोविड रुग्णसंख्या झपाट्याने खाली, घाटीत फक्त ४० रुग्ण

मनोज साखरे
Tuesday, 9 February 2021

मार्च २०२० नंतर कोरोनाचा संसर्ग वेगात होता. या काळात दरदिवशी घाटीत ५० ते ६० रुग्ण भरती झाले.

औरंगाबाद : संसर्गाची लाट असताना घाटी रुग्णालयात चारशेपेक्षा अधिक कोरोना रुग्ण भरती होत होते. पण जसा जसा कोरोनाचा संसर्ग मंदावत गेला, तशी रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. कोविड रुग्णांची संख्या आता ४० इतकी झाली आहे. त्यामुळे घाटीचा ताण बऱ्याच अंशी कमी झाला आहे. मार्च २०२० नंतर कोरोनाचा संसर्ग वेगात होता. या काळात दरदिवशी घाटीत ५० ते ६० रुग्ण भरती झाले. दररोज पाच ते सहा जणांचा मृत्यू व्हायचे पण मृत्यूतही कमालीची घट झाली आहे.

दररोज भरती होण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. आता दरदिवशी तीन ते पाच रुग्ण भरती होतात. सध्या घाटी रुग्णालयात कोविडबाधित ४० रुग्ण आहेत. त्यातील २७ जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या घाटीत ८ रुग्ण संशयित आहेत. आतापर्यंत घाटी रुग्णालयात ४ हजार १९५ कोविडबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

दोन हजार ७९१ जणांना सुटी
घाटी रुग्णालयातून आतापर्यंत दोन हजार ७९१ कोविडबाधित रुग्णांना सुटी झाली आहे. तसेच आज (ता. नऊ) जालना रस्ता, रचौधरी कॉलनी येथील ५१ वर्षीय व टिळकरस्ता वैजापूर येथील ४६ वर्षीय पुरुषाला सुटी झाली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates Covid Patient Numbers Come Down