esakal | सहायक पोलिस निरीक्षक ताईतवाले यांच्यावर औरंगाबादेत जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

API Satyajit Taitwale

सिडको भागात गेले असता सहा हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत वाहन त्यांच्या अंगावर घातले. यात ते खाली पडले असता सहा जणांनी त्यांना लोखंडी राॅडने हल्ला केला.

सहायक पोलिस निरीक्षक ताईतवाले यांच्यावर औरंगाबादेत जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या अंगावर वाहन घालून लोखंडी राॅडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना औरंगाबादेतील सिडको चौकात सोमवारी (ता.एक) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. ताईतवाले यांच्यावर मुकुंदवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते औरंगाबादेत कुटुंबीयांसोबत राहतात.

मुंगेरीलाल निर्मला सीतारामन यांचे हँसीन सपने, इम्तियाज जलील यांची अर्थसंकल्पावर टीका

सध्या ते शिऊर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक आहेत. सोमवारी एका हाॅटेलमध्ये गेले असता तिथे काही लोकांसोबत ताईतवाले यांचा वाद झाला. या नंतर ते सिडको भागात गेले असता सहा हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत वाहन त्यांच्या अंगावर घातले. यात ते खाली पडले असता सहा जणांनी त्यांना लोखंडी राॅडने हल्ला केला.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

यात सत्यजित ताईतवाले गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. माजी नगरसेवक मनोज गंगावे आणि स्थानिकांनी ताईतवाले यांना रुग्णालयात दाखल केले. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी ताईतवाले यांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे जारवाल यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

go to top