
येणाऱ्या काळामध्ये कोणीचीही जाॅब गॅरंटी राहणार नाही. जे खासगी क्षेत्रात लोक येतील सरकारी कंपन्या खासगी कंपन्या घेतील ते कशासाठी त्यांना ठेवतील?
औरंगाबाद : मुंगेरीलाल निर्मला सीतारामन यांचे हँसीन सपने अशी पहिली प्रतिक्रिया केंद्रीय अर्थसंकल्पावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी बोलताना आज सोमवारी (ता.एक) दिली. असे वाटत आहे, की या देशात कोणत्याही समस्या राहिलेल्या नाहीत. देशामध्ये फक्त विकासाची गंगा वाहत आहे.हे ऐकायला बर वाटत होते. पण खऱ्या अर्थाने जे इनर पाॅईन्ट्स आहेत ते कसे करणार ते किती शक्य आहे हे कळायला मार्ग नाही. जे आकडे दाखविण्यात आले आहे, ते एक सोप म्हणजे या देशाला त्यांनी (सरकारने) विकायला काढले आहे, अशी घणाघाती टीका जलील यांनी केली आहे.
येणाऱ्या काळामध्ये कोणीचीही जाॅब गॅरंटी राहणार नाही. जे खासगी क्षेत्रात लोक येतील सरकारी कंपन्या खासगी कंपन्या घेतील ते कशासाठी त्यांना ठेवतील? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुन आपल्याकडे दररोज बेरोजगारी वाढत आहे. त्यात भर पडणार आहे. यात दुमत नाही, असे मला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी म्हटल स्वच्छ भारत, सुंदर भारत, परवडणारी घरे हे ऐकायला इतक बर वाटत, की मी मागच्या काही वर्षांमध्ये बघितले आहे.
हाॅस्पिटलमध्ये बेड्स नाही. जिथे ती आहेत तिथे डाॅक्टर नाहीत. डाॅक्टर आहेत तिथे औषधे नाहीत. यामुळे लोक मेले आहेत. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आज बजेट सादर केले गेले. लोकांना सोप्या भाषेत सांगायला हवे होते. बजेट सादर करण्याच्या वेळेस विशेषतः भाजप खासदारांनी दर दोन मिनिटांनी टाळ्या वाजवायला सांगितले होते, असे खासदार जलील यांनी उपहासात्मक टीका केली. या बजेटमधून काही साध्या होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संपादन - गणेश पिटेकर