esakal | आईवडिलांची परिस्थिती पाहवत नसल्याने वैशालीने उचले टोकाचे पाऊल, लग्नाचे स्वप्न राहिले अधूरे
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News Vaishali Jadhav

वैशालीच्या आई वडिलांची वैशालीचे देखील चांगले लग्न करण्याचे स्वप्न होते.

आईवडिलांची परिस्थिती पाहवत नसल्याने वैशालीने उचले टोकाचे पाऊल, लग्नाचे स्वप्न राहिले अधूरे

sakal_logo
By
संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथील २० वर्षीय अविवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास लावून बुधवारी (ता.24) आत्महत्या केली आहे. वैशाली राधाकिसन जाधव असे या तरुणीचे नाव असून तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिलेली आहे. त्यानुसार वैशालीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची. त्यात त्यांनी वैशालीच्या अगोदर चार मुलींचे लग्न केलेले आहे.

वाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

वैशालीच्या आई वडिलांची वैशालीचे देखील चांगले लग्न करण्याचे स्वप्न होते. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली असल्याने या नैराश्यातुने तिने हे टोकाचे पाऊल उचलेले आहे. असे त्या चिठ्ठीत लिहिलेले आहे. शिवाय तिने कुणालाही या आत्महत्येस जबाबदार धरलेले नाही. वैशालीच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. करमाड येथील पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पाटील पुढील तपास करित आहेत.

वाचा - संजना जाधव देणार माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना टक्कर? सरपंच, उपसरपंचांच्या सत्काराला लावली हजेरी

संपादन - गणेश पिटेकर