esakal | संजना जाधव देणार माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना टक्कर? सरपंच, उपसरपंचांच्या सत्काराला लावली हजेरी

बोलून बातमी शोधा

Sanjana Jadhav News}

उलट सरपंच व उपसरपंच निवडीत संजना जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

संजना जाधव देणार माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना टक्कर? सरपंच, उपसरपंचांच्या सत्काराला लावली हजेरी
sakal_logo
By
मनोज पाटील

नागद (जि.औरंगाबाद) : माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे नेहमी चर्चेत असतात. नुकत्याच पार पडलेल्या पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे पूर्ण राज्याचे लक्ष होते. जाधव यांचा मुलगा आदित्य जाधवने आई संजना जाधव यांच्याविरोधात पॅनल उभे केले होते. या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना हवे तसे यश मिळाले नाही. उलट सरपंच व उपसरपंच निवडीत संजना जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माजी हर्षवर्धन जाधव नेहमी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून संवाद साधत असतात.

वाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

यामध्ये संजना जाधव भूमिका मांडताना सहसा दिसत नाही. मात्र नागद येथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्काराचा समारंभ संजना जाधव मित्र मंडळाकडून आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार संजना जाधव यांच्या हस्ते (ता.23) करण्यात आला. हर्षवर्धन जाधव यांच्याकडूनही कन्नड तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होत असल्याचे त्यांच्या विविध कार्यक्रमातून दिसत आहे. अशातच संजना जाधव मागे नसल्याचे यातून दिसून येत आहे. सध्या कन्नड तालुक्यात हर्षवर्धन जाधवांबरोबर त्यांची सहकारी ईशा झा याही सक्रिया झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

वाचा - वैजापूर-श्रीरामपूर रस्त्यावर दोन दुचाकींचा भीषण अपघात, एक ठार तर आठवीतील दोन विद्यार्थी गंभीर जखमी


ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती  
नागद पंचायत समिती सर्कलमधील पाच ग्रामपंचायतींच्या नुकत्याच निवडणुका झाल्य़ा. यामध्ये सायगव्हाण, नागद, नागद तांडा, बेलखेडा, सोनवाडी या गावांचा समावेश होता. या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार संजना जाधव मित्र मंडळाकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा शाल, हार, नारळ देऊन संजना जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पाचही ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, हजर होते.

औरंगाबादच्या ताज्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रसंगी  या पाचही ग्रामपंचायतींतर्फे संजना जाधव यांचा देखील सत्कार करण्यात आला. सायगव्हाण येथील ग्रामस्थ दिलीप पाटील, रमेश पाटील,  बाबुसींग राठोड, भाऊसाहेब सौदाने, नागद येथील ग्रामस्थ अशोक पाटील, सुभाष महाजन, बबलू पाटील, भोला महाजन, नागद तांडा येथे पंचायत समिती सदस्य देविदास राठोड, सुदर्शन राजपूत, सुदाम राठोड, बेल खेडा येथे बापू पाटील, राजू कापसे, प्रभाकर सुर्यवंशी, आपा पाटील, आजमल राठोड, सोन वाडी येथे ज्ञानेश्वर राठोड, साहेबराव पवार, प्रेमदास राठोड, किसन राठोड, अरुण पाटील यांच्यासह  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर